अजितदादानी केली आवळे कूटुंबाची आस्थेने विचारपुस
चंद्रपुर:-नुकताच काल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधि पक्ष नते अजित दादा पवार यानी चन्द्रपुर येथील सिस्टर काॅलनि नजीक उमाटे लेआउट येथिल पुर भागातील पाहणी करित असताना गरीब व दलित कुटुंब सौ अश्विनी जोगेश्वर आवळे यांच्या घरी येवुन मोठ्या आस्थेने विचारपूस करित घरात शिरलेल्या पुराच्या पाण्यानी झालेल्या नुकसानाची पाहणी केली.पूरग्रस्त भागातील झालेल्या नुकसानाची त्वरित मदत मिळावी अशी मागणीचे निवेदन ही सौ आवळे यानी अजित दादा ना दिले.
महिन्या भरापासुन पाऊस थांबता थांबेना याच पाउसामुळे एका आठवड्यात दोनदा पुर आला पहिल्या पुरात सौ अश्विनी जोगेश्वर आवळे यांच्या घरातील खालच्या मजल्यात साधारण पणे सहा ते सात फुट पाणी शिरले यात घरातील वापरात असलेल्या सामान,भांडी कुंडी घरातच पोहनी लागल्याने ते दृश्य पाहात असताना अश्विनी आवळे,जोगेश्वर आवळे मुलगा प्रतिक आवळे यांच्या डोळ्यात दुखाश्रु वाहू लागले.तर तिकडे झपाट्याने पाणी वाढत असताना मनात भितिचे वातवरण वाढू लागले अंधा-या रात्री चे दोन दिवस मोठ्या कठिण चे काढले रिस्तेदारानची ही चिंता वाढली.अशातच पुराच्या चौथ्या दिवसी पुर ओसरू लागल्याने थोडी भिती कमी झाली परंतू पुराच्या पाण्याने पै पै पैसा जमा करुन घेतलेल्या सामानाची अस्ता वेस्त पडलेली स्थिती पाहुन दुखाचा डोंगरच कोसळला.पुर उतरत पर्यंत रिस्तेदाराकडे राहण्याचा आसरा घेतला.अशातच घराला कुलुप पाहुन चोरांचा परिसरात धुमाकूळ घातला चोरी मध्ये मुलांच्या शिक्षणा करिता घेतलेला लैपटॉप,टी वी,व मोबाइल चोरानी लंपास केला.त्याची रीतसर तक्रार रामनगर ठाण्यात देण्यात आली स्थनिक गुन्हे शाखानी अठेचाळीस तासात गुन्हा उघडकीस आणुन चोरांकडून मुदेमाल हस्तगत केला. पुरस्थिती भागात सर्वच पक्षाचे नेते,पदाधिकारी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते,पुरग्रस्ताना मदत करीत होते.
अशी माहिती अश्विनी आवळे व जोगेश्वर आवळे यानी घरी आलेल्या विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार,आमदार किशोर जोरगेवार, यांना दिली. दादानी संपूर्ण घराची पाहनी करुन येथिल आधिका-याना घराचा पंचनामा करण्यास सांगून तत्काळ मदत मिळवून देण्यात येईल असे आश्वासन अजित दादा नी दिले. या प्रसंगी पुरामुळे घराची व सामानाची तत्काळ पंचनामे करुन पुरग्रस्ताना आर्थिक मद्दत देण्यात यावी,नदीचे खोलीकरण करुन परिसरातील जनतेला पुराचा फटका बसू नये या करिता सरक्षण भिंत बांधण्यात यावी, ,मोठ्या नाल्यामुळे उद्बभवत असलेली पुर परस्थिति आळा बसवा या करिता नाल्याचे व नालिचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी करित या संदर्भांचे निवेदन ही अजित दादा पवार यानां देण्यात आले .या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र वैद्य,दिपक जैसवाल,आबिद अल्ली,या सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पूरग्रस्त भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूरग्रस्तांशी अतिशय मोकळेपणाने अजितदादांनी संवाद साधला.त्यांना दरवर्षी येणा-या संकटातून वाचवण्यासाठी काय नियोजन करावे लागेल याचा आराखडा कसा तयार करता येईल याबाबत मी तज्ञांशी बोलतो असंही ते म्हणाले.यावेळी माझ्या घराचं किती नुकसान झाले याबाबत त्यांनी जिव्हाळ्याने विचारपूस केली. आम्ही माननीय बाळासाहेब खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षातर्फे त्यांना निवेदन देण्यात आले.
अश्विनी जोगेश्व्वर आवळे
उमाटे ले आउट चंद्रपुर