Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै २९, २०२२

वीज ही उन्नतीचा आधारस्तंभ – आमदार क्रिष्णाजी गजबे


आजादी का अमृत महोत्सवातंर्गत महावितरणद्वारा

"ऊर्जा क्षेत्रातील क्रांती आणि २०४७ पर्यंतचे ध्येय"  

वडसा:                                                             आजादी का अमृत महोत्सवाअंतर्गत "उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य -पॉवर @2047"  या अभियांनातर्गत महावितरण गडचिरोली मंडळाद्वारा "ऊर्जा क्षेत्रातील क्रांती आणि २०४७ पर्यंतचे ध्येय" या कार्यक्रम हा कार्यक्रम आज दिनांक २९ जुलै २०२२ रोजी स्थानिक रसोई सेलेब्रेशन हॉल, आरमोरी रोड,सभागृह वडसा, येथे पार पडला. 

      आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत उज्वल भारत उज्वल भविष्य पॉवर @२०४७ कार्यक्रम अंतर्गत ऊर्जा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला मुख्य प्रमुख् म्हणून मा.श्री. अशोकजी नेते, खासदार गडचिरेाली हे आभासी माधमातून उपस्थित राहिले. तसेच प्रमुख् अतिथी व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. क्रिष्णाजी गजबे, आमदार, आरमोरी विधानसभा मतदार संघ, अतिरिक्त जिल्हाधिकारी ध्नाजी पाटिल, महापारेषणचे अधिक्षििक अभियंता श्री. प्रफुल्ल अवघड, मा. श्री. अरुण श्रीवास्तव, महाव्यवस्थापक, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, मा. रवींद्र गाडगे, अधीक्षक अभियंता, सुहास मेत्रे, अधीक्षक अभियंता(पायाभूत आराखडा), चंद्रपूर परिमंडळ, चंद्रपूर, उपस्थित होते.
ते. सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने झाली. 



   कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अरुण श्रीवास्तव महाव्यवस्थापक पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन यांनी केले. प्रास्ताविकातुन त्यांनी वीजेच्या निर्मितीमध्ये १६९गीगॅवॅट  उत्पादन  क्षमतेची पडली,  ज्यामुळे आपल्या  देशाला  विजेच्या  तुटीपासून वीज  अधिशेषात बदलले , १  लाख ६   सर्कीट किलोमीटर पारेषण वाहिण्या  जोडल्या, संपूर्ण देशाला एकाच   फ्रिक्वेन्सीवर  चालणाऱ्या एका  ग्रिडमध्ये जोडले त्यामुळे आपले देश हे  जगातील   सर्वात मोठे एकात्मिक ग्रिड  म्हणून  उदयास   आले.  २०१८   मध्ये १०० टक्के  ग्राम विदयुतीकरण  (१८ हजार ३७४)   आणि    १०० टक्के  घरगुती  विदयुतीकरण  (२ कोटी ८६)   साध्य  केले. प्रणाली बळकटीकरणासाठी  रु.  २.०२  लाख  कोटी   खर्च केले.  ग्रामीण     भागातील     वीज    पुरवठा २०१५  मध्ये १२ होत होता तो सध्या २२.५  तासांपर्यंत वाढला  आहे. सर्वात  वेगाने वाढणारी अक्षय ऊर्जा  (नवीकरनीय)    क्षमता -  २०१४  मध्ये ७६ गीगॅवॅटवरुन वरुन  दुप्पट होऊन  १६० गीगॅवॅट झाली   आहे;   २०२१ मध्ये ४० टक्के  अक्षय ऊर्जा उपत्पादनाचे  ध्येय साध्य केल्या गेल्यामुळे जागतिक   स्तरावर देश चौथ्या स्थानावर आहे असे प्रतिपादन केले.



  महापारेषण चे अधिक्षक अभियंता श्री. अवघड यांनी माध्यामातून बातम्यांच्या स्वरुपात महावितरणच्या कार्यांची , ते करीत असलेल्या चांगल्या कामांची योग्य देखल घेतली जात असून त्याबददल माध्यमांना धन्यवाद दिले. तसेच महावितरणद्वारा दिल्या जाणऱ्या विविध ऑनलाईन सेवा, व इतर ग्राहकाभिमूख कार्याबददल महावितरणचे कौतूक केले.

      याप्रसंगी महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री. सुहास म्हेत्रे यांनी आपले मनोगतातून वीजपुरवठा शास्वत व उच्च दर्जाचा व्हावा यासाठी  महावितरणचा पायाभूत आराखडा विभाग कार्यरत असून ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा देण्यास कटीबध्द असल्याचे प्रतिपादन केले. 

     नोडल अधिकारी म्हणून गडचिरोली मंडळाचे अधिक्षक अभियंता श्री. रविंद्र गाडगे, यांनी गेल्या आठ वर्षात महावितरणद्वारा करण्यात आलेल्या विविध कामाचा लेखाजोखा मांडला. तसेच महावितरणचे अभियंता व कर्मचारी तीनही ऋतूत , विपरीत परिस्थितीतही सवेचे व्रत पाडीत आहे. व ग्राहकसेवेप्रति आम्ही समर्पित असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले


महावितरण च्या विविध योजणांचे लाभार्थी श्री जनार्दन कोलटवार,  शशिकांत  गेडाम, अशोक डोंगरवार, रामसिंग ननोटी यांचा सत्कार सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. तसेच कला साधना केंद्र व लोकजागृती समूह यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात गडचिरोली मंडळ द्वारा निर्मित लघु नाटिका सादर करण्यात आली. या लघु नाटिका मधून अटल सौर कृषिपंप/मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमधून शेतकरी बांधवाचे जीवनमान  कसे उंचावले गेले व त्यांना दिवसा विजपुरवठा झाला याबद्दल सादरीकरण करण्यात आले.

    अध्यक्षिय संबोधनातून कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. क्रिष्णाजी गजबे, आमदार, आरमोरी विधानसभा क्षेत्र यांनी मा. पंतप्रधान भारत सरकार यांच्या संकल्पनेतून उज्वल भारत उज्वल भविष्य बनविणे ही आपल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी असून जिल्यातील दुर्गम भागापर्यंत  वीज पोहचवावी व एक उज्वल भारत निर्माण करण्याकरिता सहकार्य करावे असे सांगितले.  वीज ही उन्नतीचा आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. केंद्र व राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या विविध योजनांची जसे एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रम, गतिमान विद्युत विकास कार्यक्रम, कुसुम योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, उच्चदाब वीज वितरण प्रणाली योजना, नवीन कृषी ऊर्जा धोरण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना, ग्रामस्वराज्य अभियान, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण विद्युतीकरण योजना या सर्व सामान्य जनता व शेतकरी बांधवांच्या हितासाठी सुरु केल्या असून त्यामधून त्यांची प्रगती होत असल्याचे प्रतिपादन केले.

     या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भूयार यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.