दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये पुन्हा एकदा विषारी दारू नागरिकांच्या जीवावर उठली आहे. बोटाद आणि अहमदाबाद जिल्ह्यात विषारी दारू सेवन रविवार आणि सोमवार या दोन दिवसांत 24 जणांचा मृत्यू झाला, तर 40 जणांना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यामुळे मृतांची आकडेवारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विषारी दारु सेवन केल्याने बोटाद जिल्ह्यातील रोजिद गावात सर्वाधिक 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण अत्यावस्थ आहेत. त्यांच्यावर जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या शिवाय अलावा उंचडी, चंदरवा, आकरू आणि अनिवारी या गावांतही मृत्यूचे तांडव सुरूच आहे. विषारी दारूने दोन दिवसांत 15 जणांचा बळी घेतला आहे. धक्कादायक म्हणजे अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
#Alcohol #Gujarat