Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जून ०६, २०२२

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणासंदर्भात थर्ड पार्टी ऑडिट करणार : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची माहिती

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणासंदर्भात थर्ड पार्टी ऑडिट करणार : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची माहिती





चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे ताडोबामध्ये जगातून लोक पर्यटनासाठी येतात मात्र शहरात प्रवेश करताच प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे यावर तोडगा काढण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. (NCP Supriya sule)

आज सहा जून रोजी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्याला भेट दिल्यानंतर शहरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.
चंद्रपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन वंदन केले.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वन्यजीव मानव संघर्ष मोठ्या प्रमाणात आहे. पर्यटन आणि मानव संरक्षण या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडे आणि प्राणी महत्वाचे घटक आहेत. चंद्रपूर शहरातील प्रदूषण कमी व्हावे आणि त्यावर उपाय करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून थर्ड पार्टी ऑडिट केले जाईल त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदक पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली जाईल अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यावेळी दिली. यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र वैद्य,  राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


https://youtu.be/PBNnXQPWaME


Third party will conduct audit regarding pollution in Chandrapur district: Information of NCP leader Supriya Sule

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.