Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जून १९, २०२२

स्वातंत्र्यच्या ७५ वर्षानंतरही भारतीय लोकशाहीवर उच्चवर्गीय १५ ते २० टक्के यांचाच कब्जा | Dr Suresh Mane

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांची टीका 


भारत देश जगामध्ये सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश मानला जातो. प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकांमध्ये व राज्य विधीमंडळ निवडणुकांमध्ये देशातील करोडो मतदार हे मतदानाचा अधिकार बजावीत आहेत. मात्र, स्वातंत्र्यच्या ७५ वर्षानंतरही भारतीय लोकशाहीवर उच्चवर्गीय १५ ते २० टक्के यांचाच कब्जा आहे, असे प्रतिपादन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुरेश माने (Dr Suresh Mane) यांनी केले. 


चंद्रपूर येथील श्रमिक पत्रकार भवनात १९ जून रोजी ते बोलत होते.  ते म्हणाले, या देशातील संसद किंवा विधीमंडळाच्या निवडणुकात मतदार म्हणून विविध समाज घटकांचा समावेश असतो. त्याच प्रमाणात मात्र त्यांचे रूपांतर त्या वर्गाचे लोकप्रतिनिधीत्व किंवा सरकारमध्ये तेवढयाच प्रमाणात होत नसल्यामुळे भारतीय लोकशाही हे मूठभर तथाकथित १० ते १५ टक्के उच्चवर्गीय यांच्याच ताब्यात आहेत. इथला बहुसंख्यांक वर्ग मतदाराच्या भूमिकेत आहे.  ही भारतीय लोकशाहीसाठी चिंताजनक बाब असल्याचे ते म्हणाले. 

सर्वात मोठा समाज घटक असलेला ओबीसी समाज याचे वर्तमान लोकसभेत जवळपास १३७ वर संख्याबळ असतानासुध्दा ओबीसी जनगणना सारख्या अत्यंत महत्वपूर्ण राष्ट्रीय प्रश्नावर या सर्व खासदारांना लोकसभेत गप्प राहावे लागते, अशी टीकाही त्यांनी केली.  

ADV. (DR.) SURESH MANE. WORLI (MUMBAI CITY). Party:NCP. S/o|D/o|W/o: Mane Tatoba. Age: 59. Name Enrolled as Voter in: 183 Shivadi (Maharashtra) constituency .




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.