दिलीप पनकुले परिवार आयोजित विश्वमोहिनी अनसूया माता ह्यांच्या कृपाळू कृपेने व आपणा सर्वांच्या साक्षीने पारडसिंगा निवासिनी महालक्ष्मी अनसूया ह्यांच्या ९६ व्या जन्मोत्सव व मंदिराच्या २२ वर्धापन दिनानिमित्त गुरुवार दिनांक ५ मे २०२२ रोजी मा. गिरीष वऱ्हाडपांडे ह्यांच्या पौराहित्याखाली अनसूया माता मंदिर, शांती विद्या भावन परिसर, डिगडोह (देवी) हिंगणा रोड, नागपूर येथील शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला. ह्या धार्मिक उत्सवाला माजी केंद्रीय मंत्री सुबोधजी मोहिते, महिला आयोग सदस्य सौ. आभाताई पांडे, मा. आमदार दीनानाथ पडोळे, प्रभाकरराव देशमुख, सरपंच मा. इंद्रायणी काळबांडे, प्रदेश उपाध्यक्ष बजरंगसिंह परिहार, मा. श्री. उमेशसिंग राजपूत, पंचायत समिती सदस्य मा. कैलास गिरी, उपसरपंच, संजय चोपडे, मा. श्री. बिज्जू पांडे, प्रदीप ठाकरे व सतीश पवार परिवार, राजेंद्र आसलकर परिवार यांनी सेवा रुजू केली.
सकाळी ७:०० वाजता मातेचे मंगलस्नान व पालखीची पूजा आचार्य हरिक्रिष्ण मिश्रा व आचार्य विवेक तिवारी ह्यांच्या मंत्रोच्चाराने संपन्न झाले. सकाळी ८.०० वाजता मंगलआरती व होमहवन, सकाळी ८. ३० वाजता मातेची पालखी व दिंडी सोहळा. दीपक रडके, विजय कोटगुले, नगरसेवक राहुल पांडे आयोजित डिगडोह (देवी) येथे प्रदक्षिणा करण्यात आली. या पालखी सोहळ्यात डिगडोह येथील अभिजित शेंडे, परमात्मा ग्रुप, नितीन रडके, संजय कोल्हे, रितेश कोल्हे अल्पोपहार वितरण, संतोष यादव, पेय वाटप फैजल शेख ह्यांचा सहभाग होता. हा सोहळा श्री. जगदीश बँड पार्टीचे श्री. देविदास हरिदास अडांगळे ह्यांच्या मंगलधूनसह संपन्न झाला. सकाळी ११.३० वाजता महाआरती, छप्पन भोग व महाप्रसाद वितरण करण्यात आले. दुपारी ३.०० ते ४.०० वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम सोहळा, आयोजक, पं. हरिक्रिष्ण मिश्र (वेदाचार्य) आयोजित जय दुर्गा भजन मंडळ, डिगडोह व सायंकाळी ४.०० ते ६.०० दत्ता गणोरकर यांचे अनसूया माता भजन मंडळ, नागपूर, ६.०० ते ७.३० आईचा गोंधळ व जागरण (पराग गोंधळी), तसेच सायंकाळी ७.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते महाआरती, महाप्रसाद व गोपालकालाचे वितरण करण्यात आले. हजारो भक्तांनी आईच्या चरणी सेवा रुजू केली.
ह्या प्रसंगी भक्तांनी सहकुटुंब, सहपरिवार व इष्टमित्रांसह उपस्थित राहून परमेश्वरचरणी आपली सेवा तन मन धनाने रुजू करावी अशी विनंती दिलीप पनकुले परिवार तसेच शांती विद्या भवनचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच सौ शुभांगी पनकुले परिवार, डॉ. रमेश पाटील, सुभाष वऱ्हाडे, मा. गणेश धानोरकर, ॲड. प्रमोद शिंदे, वसंत घटाटे, प्राची ढोले, संजय खटी, श्रृती सुधीर मुलमुले, अजय धोटे, बंडू ढोले, सौ. भावना अतुल टोळ, संजय शेवाळे, सरदार रवींद्रसिंह मुल्ला, अशोक बैसवारे, सोपानराव शिरसाट, प्रमोद वानकर, विनोद पानतावणे, बबलू चौहान, मंदार हर्षे, श्रीनिवास दुबे, योगेश चौधरी ह्या भक्तगणांनी केली होती.
Palkhi of mother Anusuya in the form of Lakshmi, Janmotsav and anniversary program of the temple