Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे ०९, २०२२

भाजप प्रणीत शेतकरी आघाडी परिवर्तन पॅनलची बोरटोला सहकारी संस्थेवर एकहाती सत्ता.




संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.९ मे:-
बोरटोला(सावरटोला)येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या काल दि.८ मे ला झालेल्या निवडणुकीत भाजप समर्थित पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस समर्थित पॅनलनेही ही निवडणूक लढवली होती. मात्र या दोन्ही पक्षाच्या पॅनलचा दारुण पराभव झाला.विशेष म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी ही निवडणूक लढवून प्रतिष्ठेची केली होती. परंतु या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलचा पार धुव्वा उडाला. एकही उमेदवार निवडून आले नाही,तसेच काँग्रेसचे राजकुमार डोये यांचा फक्त एका मताने विजय झाला.सावरटोला,बोरटोला,बीडटोला, भुरसीटोला,उमरी या ५ गावच्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधीधित्व ही विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित,बोरटोला. रजिस्टर नंबर १२७३ ही संस्था करीत आहे.१३ सभासद संख्या असलेल्या संस्थेत भाजप समर्थित १२ , व काँग्रेसचा १ सदस्य निवडून आला आहे.त्यामुळे सेवा सहकारी संस्थेवर भाजपप्रणीत पॅनल ची एक हाती सत्ता आली आहे.भाजपाच्या शेतकरी आघाडी परिवर्तन पॅनलचे इतर मागास प्रवर्ग गटातून डॅनी महादेव डोये, महिला राखीव प्रतिनिधी नीता राजेश मेश्राम, वंदना दामोदर हेमने, अनुसूचित जाती जमाती योगेश चंद्रकुमार लाडे, भटक्या विमुक्त जाती जमाती लक्ष्मण जगन मेश्राम, सर्वसाधारण कर्जदार गटातून भाऊराव अंताराम गायकवाड, महादेव शिवा डोये, गुलाब इस्तारी ढोक, कृष्णा पांडुरंग येरणे, विलास नामदेव बोळणे, काशीराम रामा भेंडारकर, वामन गोमा राऊत हे विजयी झाले.तर काँग्रेस प्रणित पॅनलचे राजकुमार नारायण डोये एक मताने विजयी झाले.
ही निवडणूक जिंकण्यासाठी काशिनाथ कापसे उपसरपंच बोरटोला, प्रेमलाल नारनवरे , सुरेश ब्रम्हणकर ताराचंद येरणे , लक्ष्मण येरणे, गीताबाई नारनवरे, गोपाल वैद्ये , एकनाथ वैधे,सखाराम सय्याम,देवराम कापसे, हेमने भुरशी, यादोराव मेश्राम, राजेश मेश्राम,
निताराम दांडेकर, सुभाष सूर्यवंशी, नीताराम येरणे यांनी विशेष परिश्रम घेतले.विशेष म्हणजे लायकराम भेंडारकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद सदस्य व गटनेते, यांनी ही निवडणूक भाजपने निवडून येण्यासाठी प्रतिष्ठेची करून संघटन करून लढवली, व एकहाथी सत्ता स्थापन केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.