Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे ०९, २०२२

चंद्रपूर जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुका लवकरच

नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील प्रारूप प्रभाग रचना व प्रभागदर्शक नकाशावर हरकती व सूचना आमंत्रित

Ø 10 ते 14 मे 2022 पर्यंत हरकती व सूचना

Ø 23 मे रोजी आक्षेप व हरकतीवर सुनावणी




चंद्रपूर दि. 9 मे: चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, वरोरा, चिमूर, मूल, राजुरा, घुग्घुस व नागभीड या नगरपरिषदांच्या व भिसी नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास दि. 7 मार्च 2022 रोजी मान्यता दिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशास अनुसरून राज्य निवडणूक आयोगाच्या दि. 10 मार्च 2022 रोजी सुरू असलेल्या टप्प्यांपासून निवडणुकांची कार्यवाही त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्याअनुषंगाने आयोगाने दि. 6 मे 2022 रोजी सुधारित प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम-2022 जाहीर केल्यानुसार उपरोक्त नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील प्रारूप प्रभाग रचना व प्रभागदर्शक नकाशावर हरकती व सूचना मंगळवार दि. 10 मे ते शनिवार दि. 14 मे 2022 पर्यंत संबंधित नगरपरिषद, नगरपंचायत कार्यालयात मागविण्यात येत आहे.

दि. 10 मार्च 2022 पासून प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या आक्षेप व हरकतीसह सुधारित कार्यक्रमानुसार नव्याने प्राप्त होणाऱ्या आक्षेप व हरकतीवर सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे सोमवार दि. 23 मे 2022 पर्यंत घेण्यात येईल. असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.


Municipal council elections in Chandrapur district coming soon


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.