संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.७ मे:-
राजर्षी शाहू महाराज यांची स्मृति शताब्दी महोत्सव राज्यात ठिकठिकाणी साजरे केले जात आहे. या निमित्त कोल्हापूर चे जिल्हाधकाऱ्यांच्या वतीने १०० सेकंद स्तब्धता पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. राजर्षी छत्रपती शाहू राजांनी केलेल्या सामाजिक कार्याची कृतज्ञ ता व्यक्त करणे हा यामागचा उद्देश होता.
या निमित्ताने वरिष्ठांचे मार्गदर्शन खाली सशस्त्र दूर क्षेत्र धाबेपवनी येथे स्तब्धता पाळून आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त ६ मे रोज शुक्रवारला त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून करून लोकराजाला अभिवादन करण्यात आले. यावेळी अझरुद्दीन शेख पोलिस उपनिरीक्षक यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्याविषयी आपल्या भाषणातून माहिती दिली. यावेळी गोंदिया जिल्हा पोलिस चे आणि भारतीय राष्ट्रीय बल १५ चे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.