चंद्रपूर शहरातील मोहल्ला बाबुपेठ शिट नं . १२ ९ , न.भु.प्र . १६७ ९ ० व न.भु.प्र . १६७ ९ १ ची जागा मनपास हस्तांतरीत करण्याची आमदार सुधीर मुनगंटीवार यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
माजी नगरसेविका कल्पना बगुलकर यांच्या मागणीवरुन 20 मे रोजी बैठक घेण्याची सूचना
चंद्रपूर शहरातील हिंदुस्थान लालपेठ कॉलरी प्रभाग क्र . १६ येथील डि.एड् कॉलजेजवळ हुडको कॉलनीमध्ये दुर्बल घटकातील कमी उत्पन्नाचे नागरिकांना गाळ्यांचे मालकीहक्क मिळण्यासंदर्भात महानगरपालिकेकडून कार्यवाही प्रस्तावित आहे. चंद्रपूर शहरातील मोहल्ला बाबुपेठ शिट नं . १२ ९ , न.भु.प्र . १६७ ९ ० व न.भु.प्र . १६७ ९ १ ची जागा मनपास हस्तांतरीत करण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
माजी नगरसेविका कल्पना के . बगुलकर यांनी दिलेल्या निवेदनावरून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी 20 मे रोजी बैठक घेण्याची सूचना दिली आहे.
चंद्रपूर शहरातील मोहल्ला बाबुपेठ शिट नं . २४ ब्लॉक नं .१२ ९ , न.भु.प्र . १६७ ९ ० आराजी ३८८.३६ चौ.मी. व न.भु.प्र . १६७ ९ १ आराजी ५२६४.०२ चौ.मी. जागेचे आखीव पत्रिकेनुसार मालकी ही नझूल व्यवस्थेकरिता न.पा. चांदा यांचे नावे आहे . त्यामुळे उपरोक्त जागा ही चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे नावे करून घेणे आवश्यक असल्याने चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे पत्र दिनांक १२.४.२०२२ अन्वये विनंती केलेली आहे . दुर्बल घटकांसाठी कमी उत्पन्नाच्या नागरिकांना राहण्यासाठी ३१ निवासी इमारतीमध्ये एकूण २४८ गाळ्यांचे बांधकाम करण्यात आलेले आहे .
त्याअनुषंगाने संबंधित २४८ नागरिकांना गाळ्यांचे मालकीहक्क देण्यासंदर्भात विनाविलंब योग्य कार्यवाही करणे आवश्यक आहे . याकरिता दिनांक २० मे २०२२ रोजी संबंधित सर्व अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात यावे . या बैठकीला येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना अद्यावत माहितीसह उपस्थित राहण्याचे आदेश आपले स्तरावरून विनाविलंब निर्गमित करावे, असेही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
Letter of MLA Sudhir Mungantiwar to District Collector