संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध:-कोरोनाने मागिल दोन वर्ष हौदोस घातल्यानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आली असून,आता लग्नसराईला जोर आला आहे.लग्न म्हणताच सर्वात महत्वाची असते ती पत्रिका प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे पत्रिका छापत असतो.त्यात कुटूंबातील प्रत्येकाचे काम होईल याची खबरदारी घेतली जाते. मात्र सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड जवळील पुनर्वसीत गाव श्रीरामनगर येथील खुशाल शेन्डे यांनी त्यांच्या मुलांचे लग्नपत्रिकेत छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ व संत तुकोबा या महापुरुषांना स्थान दिले आहे.महापुरुषांचा आदर्श ठेऊन जनजागृती सुद्धा केली आहे.समाजाचे सातत्य राखण्यासाठी विवाह अतिशय आवश्यक आहे.प्राचीन काळापासून तर आजतागायत विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.प्रत्येक धर्मानुसार विवाहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे.कुणी संस्कार,तर कुणी त्याला करार समजतात.स्त्री-पूरूषांकरिता विवाह अत्यावश्यक मानून जात व धर्मानुसार विवाह होतात.विवाह जुळल्यानंतर ब-याचशा रूढी परंपरा व नियमांचे पालन केले जाते.एकदा वर-वधूची निवड झाली की तारीख ठरवून सर्वप्रथम लग्नपत्रिकेची सेटिंग केली जाते.यातच लग्नपत्रिका अत्यंत महत्त्वाची,पण तिची सेटींग करताना बरीच कसरत करावी लागते.कोणाचे नाव टाकायचे की नाही, याबाबत सल्लामसलत करून पत्रिका छापली जाते.विशेष करून कुटूंबातील लहान-मोठ्यांचे नाव सुटणार नाही याची काळजी घेतली जाते.
हे असे असतांनाच सडकअर्जुनी तालुक्यातील सौंदड जवळील पुनर्वसीत गाव श्रीरामनगर येथील खुशाल शेन्डे यांचे कनिष्ठ चिरंजीव प्रदिप/बबलू यांचा विवाह २९ एप्रिल २०२२ ला झाला.त्यांनी आपल्या कुटुंबातील सर्वांचीच नावे पत्रिकेत टाकली.त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ,संत तुकाराम व विठ्ठल रखुमाई या महापुरुषांना पत्रिकेत स्थान दिले.कोरोना लक्षात घेऊन"दोन गज की दुरी,मास्क है जरुरी" या कोरोना कोविड-१९ च्या नियमांची जाणीव करून दिली.त्यामुळे ही पत्रिका लोकांच्या आकर्षणाचा केंद्र बनली. स्वत:च्या कुटूंबासोबत समाजहित, महापुरुषांचा आदर्श प्रत्येक कुटुंबाकडून झाले,तर शासनाचा प्रसार व प्रशिद्धीवर होणारा लाखोंचा खर्च वाचविण्यात मदत होईल.