Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे ०१, २०२२

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण (prema kiran) यांचं निधन झालं आहे. त्या ६१ वर्षांच्या होत्या. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अर्धांगी, धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या.

अलीकडेच त्यांनी सोनी मराठी वर सुरू असलेल्या गाथा नवनाथाची या मालिकेत देखील भूमिका केली होती.




प्रेमा किरण ह्या मराठी चित्रपटांतून अभिनय करणाऱ्या अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठी बरोबरच हिंदी व भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्या मुळच्या पुण्याच्या आहेत. त्यांनी विविध चित्रपट, मालिका, कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा व दोन हजार पेक्षा जास्त नाटकांमध्ये काम केले आहे.

८०,९० च्या दशकात प्रेमा किरण यांना अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. दे दणादण, धुमधडाका चित्रपटातील त्यांची आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. चित्रपटातील त्यांची गाणी आजही तितकीच प्रसिद्ध आहे.

प्रेमा किरण यांनी उतावळा नवरा, थरकाप या चित्रपटांची निर्मितीदेखील केली होती. फक्त मराठीच नाही तर गुजराती, भोजपुरी, अवधी, बंजारा या भाषेतील चित्रपटांमध्ये त्यांनी काम करत महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

Prema Kiran is an Indian actress and producer who has worked in the Marathi and Hindi film industry. She is known for movies like Dhum Dhadaka (1985

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.