दिनांक २७ एप्रिल २०२२.
मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार मनसे पदाधिकारी सरसावले असून मनसे नागपूर येथील उत्तर विधानसभा क्षेत्रात नारी परिसर येथे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली.
प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी व शहर अध्यक्ष अजय ढोके यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली, यात अनेक विषयांवर विस्तृत चर्चा झाली. यावेळी उत्तर विभाग अध्यक्ष उमेश बोरकर , विभाग सचिव महेश माने, महिला सेना विभाग अध्यक्षा सौ. सुनीता कैथेल,मनविसे जिल्हा अध्यक्ष दिनेश इलमे व इतर वरिष्ठ पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सभेचे आयोजन व प्रास्ताविक विभाग सचिव महेश माने यांनी केले तर संचालन मनविसेचे दीपक उज्जैनकर यांनी केले. आगामी महापालिका निवडणूक,उत्तर नागपुरातील विविध प्रश्न,नवीन शाखा स्थापन करणे व इतर संघटनात्मक विषयावर या बैठकीत सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचेशी चर्चा करण्यात आली.
मनसे विभाग उपाध्यक्ष प्रविण बावणे, ॲड. हर्षल बारापात्रे, इंजि.विक्की खोब्रागडे, विभाग उपाध्यक्ष श्याम रहांगडाले, विभाग उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, विभाग उपाध्यक्ष मनिष खरे, मनविसे विभाग अध्यक्ष मनोज कहाळकर, वाहतूक सेनेचे सुजित मधुमटके, विभाग सहसचिव सुनिल गवई, प्रभाग अध्यक्ष संदिप चवरे, प्रभाग अध्यक्ष प्रभाकर वाडेकर, शाखा अध्यक्ष अमीन खान, शाखा अध्यक्ष विजय त्रिवेदी, कुंजीलाल सहारे, महिला उपाध्यक्षा प्रतिभा कडु, शाखा अध्यक्षा माया चचाणे, कांतेश्वर नगराळे, विजय निमजे, गौरव जाधव, किशोर भोईर, गणेश खडगी,राम हेडाऊ, महेंद्र निखाडे, विपीन पटले,सुधाकर काळे, अंजनाबाई सोनकुसरे, रामजी कळसाईत, अखलाक भाई, मंगेश निखाडे, गौरव साखरे यांचेसह अनेक पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
*यावेळी काही वरिष्ठ नागरिकांनी व तरुणांनी मनसेत प्रवेश केला. नवोदित सदस्यांचे श्री हेमंत गडकरी व श्री अजय ढोके यांनी मनसेचा ध्वज हाती देऊन पक्षात स्वागत केले.*