नवेगावबांध दि.२५ एप्रिल:-
जगातील सर्वात श्रेष्ठ धम्म म्हणजे बौद्ध धम्म आहे. माणसाला माणूसपणाचे खरे दर्शन आणी जाणिव फक्त बौद्ध धम्मातच होते. हे कोणी नाकारु शकत नाही. याचे फलित अनेक वर्षांपासून होत आहे. धम्म हा माणसाला जगायला शिकविते म्हणून बुद्ध धम्माशिवाय जगात माणसाला मोठे करण्याचे दुसरे साधन नाही. असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदन्त नागार्जुन सुरई ससाई यांनी केले. ते शनिवारी येरंडी येथील सुखदेवराव दहिवले यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
यावेळी मंचावर भिख्खू धम्मबोधी भिख्खू धम्मपाल भिख्खू नागसेन भिख्खू खेमाबोधी, दलितमित्र सुखदेवराव दहिवले, मालिनी दहिवले, उज्जवला मेहता नागभीड, प्रज्ञा अनंत भगत, अनिल दहिवले, डी.डी. भालाधरे आदी उपस्थित होते.
अमृत महोत्सव कार्यक्रमात उपस्थित सर्व भिख्खू वर्गानी संपूर्ण बुद्ध वंदना ग्रहण करुन, बुद्ध गाथा धम्म गाथा व संघ गाथा सादर केली. यानंतर भिख्खू वर्गाला दहिवले परिवाराकडूंन चिवरदान, भोजनदान फलदान व धम्म दान करण्यात आले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमृत महोत्सव समितीचे आयोजक व मार्गदर्शक इंजी. रत्नदीप दहिवले यांनी केले. तर संचालन व आभार चंद्रशेखर तिरपूडे यांनी मानले.