भद्रावती: चिमणी दिनानिमित्त दिनांक 20 मार्च 2022 ला इको -प्रो भद्रावती तर्फे जनजागृती तसेच पक्षीघागर वाटप कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी उपास्तीतांना चिमण्यांचे निसर्गात असलेले महत्व पटवून देण्यात आले. व पुढे चिमणी संवर्धनाकरिता वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला.
मागील काही वर्षाच्या काळात आपल्या घराच्या अंगणात दाणे टिपणारी चिमणी कुठे हरपली हे कळण्याच्या आधीच चिमण्यांची संख्या अतिशय खालावली. वाढत्या शहरीकरणामुळे, जंगलाच्या तोडीमुळे, शेतीजन्य शिवार कमी झाल्यामुळे व घरांच्या बदललेल्या रचणेमुळे दिवसेंदिवस चिमण्यांच्या संखेत कमालीची घट झालेली पाहावयास मिळत आहे. अचानक कमी झालेली चिमण्यांची संख्या लक्षात घेता सन २००९ पासून चिमणी वाचविण्याचा हालचाली सूरू करण्यात आल्या.चिमण्यांच्या संवर्धना बाबत जनजागृती करण्याकरिता सन २०१० मधे दिल्ली येथे पहिल्यांदा जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला.
याच मोहिमेला समोर नेण्याकरिता व चिमण्यांचे संवर्धन करण्याकरिता इको-प्रो भद्रावती तर्फे मागील वर्षापासून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. ज्यामध्ये नागरिकांना आपण आपल्या घराच्या आवारात चिमण्यांना चारा व पिण्याचे पाणी ठेवण्यासोबतच त्यांना राहण्या करिता कृत्रीम घरटे सुद्धा ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
रोज सकाळी दर उघळताच चिव चिव करणारी चिऊताई आता शहरी भागा सोबतच ग्रामीण भागातून सुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या चिऊताई चे संवर्धन करण्याची जवाबदारी आपण सर्वांवर आली असल्याची जनजागृती इको-प्रो भद्रावती तर्फे करण्यात येत आहे.
सदर मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करून आप आपल्या घराच्या आवारात जागा मिडेल तिथे चिमण्यांकरिता अन्न, पाणी व घरट्यांची व्यवस्था करावी असे आवाहन करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमास इको-प्रो भद्रावती तालुका अध्यक्ष संदीप जीवने, किशोर खंडाळकर, हनुमान घोटेकर, अमोल दौलतकर, मंगेश पढाल, प्रवीण दौलतकर, दीपेश गुरनुले, संग्राम पढाल व स्थानिक नागरिक उपास्तीत होते.