Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च २१, २०२२

नागपूरचा बिमार पुष्पा" : खापरखेडयाचा अभिनेता हर्षल चांदेकर याने घेतली गगनभरारी


खापरखेडयाचा अभिनेता हर्षल चांदेकर याने घेतली गगनभरारी


"नागपूरचा बिमार पुष्पा" लघुपटात महत्वाची भूमिका

अभिनेता हर्षलवर कौतुकाचा वर्षाव




खापरखेडा-प्रतिनिधी
मुख्य बाजारपेठ खापरखेडा वार्ड क्रमांक २ परिसरातील रहिवासी २४ वर्षीय तरुण अभिनेता हर्षल पुरुषोत्तम चांदेकर (Actor Hershal Chandekar) याने गगन भरारी घेतली आहे त्याने साकारलेल्या "नागपूरचा बिमार पुष्पा" हा लघुपट यु ट्यूब व सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असून एका रात्री हर्षलचे लाखो फ्लॉअर्स निर्माण झाले आहेत त्यामूळे खापरखेडा शहराची मान गौरवाने उंचावली असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नुकताच प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट "पुष्पा" सुपर हिट ठरला आहे "पुष्पा" चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुन यांची भूमिका प्रचंड गाजली आहे सदर चित्रपटाच्या आधारावर खापरखेडा परिसरातील अभिनेता हर्षल चांदेकर यांच्या संकल्पनेतून नागपुरी भाषेत हर्षल व त्यांच्या सहकाऱ्यांनी "नागपूरचा बिमार पुष्पा" हा विनोदी लघुपट तयार केला आहे सदर लघुपटाचे चित्रीकरण करत असताना हर्षलने कोणत्याही कॅमेराचा उपयोग केला नाही मोबाईल वरूनच सदर लघुपटाचे चित्रीकरण केले हे विशेष!

हर्षलचे याआधी यु ट्यूब व सोशल मीडियावर लाखो फ्लोअर्स तयार केले होते मात्र मधल्या काळात त्यांचे चॅनल हॅक झाले मात्र तो खचला नाही आपल्या अभिनयाच्या माध्यमातून विनोदी, समाजासाठी उपयुक्त ठरणारे लघुपट तयार करत राहिला "नागपूरचा बिमार पुष्पा" लघुपट यु ट्यूब व सोशल मिडियावर प्रसारित करताच हर्षलच्या लघुपटला लाखो फ्लोअर्स ने पसंती दिली.

या आधी हर्षलने स्वतःच्या संकल्पनेतून नागपुरचा मारी, कोरोना रॅप, गंग्स ऑफ नागपुर, नागपूर चा शिनच्यान, असे लघुपट तयार केले आहेत हर्षल अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी असून चिचोली (खापरखेडा) ग्रामपंचायतचे सरपंच पुरुषोत्तम चांदेकर यांचा मुलगा आहे "नागपूरचा बिमार पुष्पा" या लघुपटात हर्षलसह मयूर वाटकर, अमित चांदेकर, सतीश इंगळकर, हर्ष पंचालवार, किरण केने यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

नुकताच प्रदर्शित झालेला "झुंड" चित्रपट नागपुरातील कलावंतांनी गाजविला आहे भविष्यात हर्षल कडून अश्याच प्रकारच्या अपेक्षा आहेत त्यामूळे सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संलग्न खापरखेडा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी हर्षलचे घर गाठून हर्षल व त्यांच्या सहकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी सरपंच पुरुषोत्तम चांदेकर सावनेर पंचायत समिती सदस्य राहुल तिवारी यांच्यासह खापरखेडा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील जालंदर, सरचिटणीस कपिल वानखेडे, कार्याध्यक्ष केशव पानतावणे, जिल्हा प्रतिनिधी अमरचंद जैन, जेष्ठ पत्रकार दिवाकर घेर, पत्रकार राजेश खंडारे, गिरधारी शर्मा, मनोज डेविड, बंडूभाऊ चौरागडे, राजेश खंडारे, श्रीराम सातपुते, शामली चांदेकर आदि उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.