कू वर पोस्ट केला इमोशनल व्हीडिओ
मुंबई, 11 मार्च 2022: प्रतिभाशाली अभिनेते अनुपम खेर सध्या त्यांच्या 'काश्मिर फाइल्स' सिनेमामुळे चर्चेत आहेत. याच सिनेमासंदर्भाने खेर यांनी आज कू वर एक भावनिक व्हीडिओ पोस्ट केला आहे.
खेर यात म्हणतात, 'रसिकांना माझा नमस्कार, आजवर देवाची कृपा व तुम्हा सर्वांच्या प्रेमाच्या बळावर मी 522 सिनेमे केले आहेत. अभिनय करतो, पात्र वठवत हसवतो, रडवतो. मात्र यावेळी मी कुठलीच व्यक्तिरेखा साकारत नाहीय. मी अभिनयच केला नाही! 32 वर्षांपूर्वी लाखो काश्मिरी हिंदूंची आयुष्य बेचिराख झाली. मात्र 90 कोटी लोकसंख्येच्या देशाला काहीच कळले नाही. माध्यमं जणू मुकी-बहिरी झाली. काश्मिरमधून आम्हा हिंदूंना बाहेर काढलं गेलं. राणा गंजू, सरला भट, सर्वानंद प्रेमा, प्रेमनाथ भट आणि अशा कित्येकांचा काय दोष होता? त्यांच्यावर नेमका काय अन्याय झाला... कुणालाच माहित नाही. आजपर्यंत ना कुठला आयोग आला, ना खटला चालला... आमचं साधं म्हणणंही कुणी ऐकून घेतलं नाही."
"त्यामुळे काश्मिर फाइल्स हा सिनेमा नाही. ही कलाकृती म्हणजे जणू आम्ही तुमच्या आत्म्याच्या जो दरवाजा ठोठावतोय त्याचा आवाज आहे... मी आता अनुपम खेर नाही, मी आहे पुष्कर नाथ... जो तळमळतो आहे, तुमच्यापर्यंत पोचायला. भेटा मला... 'काश्मिर फाइल्स'मध्ये." दोन मिनीट अठरा सेकंदांचा हा व्हीडिओ बाराशेहून अधिक लोकांनी लाइक केला आहे.
'काश्मिर फाइल्स' हा सिनेमा अभिनेते विवेक अग्निहोत्री यांनी लिहीला व दिग्दर्शित केला आहे. याआधी अग्निहोत्री यांचा 'द ताश्कंद फाइल्स' सिनेमाही चर्चेत आला होता.
'काश्मिर फाइल्स'बाबत खेर सातत्याने सोशल मीडियावर लिहीत आहेत. या सिनेमात खेर यांनी पुष्कर नाथ पंडित नावाचं पात्र साकारलं आहे. पुष्कर नाथ हे तत्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक असतात. त्यांना आपल्या कुटुंबासह एका भयाण रात्री काश्मिरमधून परागंदा व्हावं लागतं.
"आज मैं सिर्फ़ अभिनेता नहीं रहा।मैं गवाह हूँ और #TheKashmirFiles मेरी गवाही है।वो सब कश्मीरी हिंदू,जो या तो मार डाले गए या जीते जी ..."
https://www.kooapp.com/koo/anupampkher/ac5c951b-2ad3-4d40-a232-f0608bacea39
Download Koo App - Connect with Millions of People & Top Celebrities:
https://www.kooapp.com/dnld