संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
नवेगावबांध दि.27 मार्च:-
कोरोनाच्या काळात ठप्प झालेली रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी हळुवार गतीने प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यात गोंदिया- वडसा -चंद्रपूर -बल्लारशा मार्गावरील रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी भाकपच्या वतीने अनेक आंदोलने करण्यात आली.त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मेमू पॅसेंजर स्पेशल ट्रेन 5 एप्रिलपासून चालवण्याचा निर्णय. गाडी क्रमांक 08804/08803 गोंदिया - बल्लारशाह जंक्शन - गोंदिया मेमू पॅसेंजर स्पेशल गोंदिया येथून 05 एप्रिल 2022 पासून आणि बल्हारशाह जंक्शन 06 एप्रिल 2022 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत धावेल.
गाडी क्र. 08804 गोंदिया - बल्लारशाह जंक्शन मेमू पॅसेंजर स्पेशल गोंदियाहून दररोज 17.05 वाजता सुटेल आणि बल्हारशाह जंक्शनला 23.45 वाजता पोहोचेल.
गाडी क्र. 08803 बल्लारशाह जंक्शन - गोंदिया मेमू पॅसेंजर स्पेशल बल्हारशाह जंक्शन दररोज 05.15 वाजता सुटेल आणि गोंदियाला 12.00 वाजता पोहोचेल.या ट्रेनमधील प्रवासादरम्यान राज्य आणि केंद्र सरकारने जारी केलेल्या कोविड-19 च्या नियमांचे पालन करावे लागेल.