चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात वाघाच्या हल्ल्यामुळे सर्व संघटनानी आक्रमक पवित्रा घेत केले कामबंद आंदोलन
चंद्रपूर येथील महा औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात वाघ आणि वन्यप्राण्यांचा हल्ला वाढत असल्याने 18 फेब्रुवारी रोजी सकाळी कामगारांनी कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला. सतत दोन दिवस वन्यप्राण्यांचा हल्ला होऊन दोनजण ठार झाले.
विद्युत केंद्राच्या परिसरात दि.१६ फेब्रुवारी २०२२रोजी कंत्राटी कामगार भोजराज मेश्राम या इसमाचा वाघाने हल्ला करून ठार केले होते. दि.१७ फेब्रुवारी २०२२ रोजी बिबट्याच्या हल्ल्यात राज भडके १६ वर्षीय तरुण ठार झाल्याने परीसरात दहशत निर्माण झाली आहे.
वनविभागाकडे प्रशिक्षीत श्युटर असते तर कदाचित वाघाला जेरबंद करता आला असते व अनेक निष्पापाचे जिव वाचले असते. सिटीपीएसच्या अवती भवती चार ते पाच वाघाचे अस्तित्व असल्याची माहिती आहे.
वाघाना जेरबंद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन भटारकर यांचे अन्यत्याग आंदोलन सुरूच असून जोपर्यंत वाघांचा बंदोबस्त करणार नाही तोपर्यंत अन्यत्याग आंदोलन सुरूच राहणार असल्याचे भटारकर यांनी सांगितले आहे. तर कामगारांनी ही जोपर्यंत वाघांचा बंदोबस्त करणार नाही तोपर्यंत कामावर न जाण्याचा पवित्रा घेतला आहे.