पुन्हा बिबट्याने केले युवकाला ठार
चंद्रपूर शहरालगत असलेल्या दुर्गापूर नेरी येथील युवकाला बिबट्याने ग्रामपंचायत च्या मागील भागातून उचलून नेले असून त्यालाही ठार केल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात राज भडके रा. दुर्गापूर नेरी, वय १६ वर्षे असे त्या युवकाचे नाव आहे. राज मडके हे सकाळी फिरायला गेले असतांना दुर्गापूर ग्रामपंचायत मागील भागातून बिबट्याने उचलून नेले आहे.या घटनांमुळे शहरात दहशत निर्माण झाले आहे.
काल दि.१६/२/२०२२ रोजी रात्री १०.३० वाजता सिटीपीएसमध्ये कंत्राटी कामगार भोजराज मेश्राम या इसमाचा वाघाने हल्ला करून ठार केले होते. त्याचे शव छिन्नविछीन्न अवस्थेत मिळाले होते. पुन्हा एक दिवस उलटत नाही तोच याच परीसरात पुन्हा बिबट्याने युवकाला ठार केल्याची घटना घडली आहे.
चंद्रपूर वनविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सिटीपीएसमध्ये आपल्या आई सोबत फिरत असतांना ऑगष्ट २०२०रोजी एका निष्पाप ५ वर्षीय मुलीचा वाघाच्या हल्ल्यात जिव गेला.
राणी हिराई विश्रामगृहात समोर एका पट्टेदार वाघाने पकडले होते. आरडाओरडा करीत कसाबसा वाघाच्या जबड्यातून बचावला त्याला गंभीर दुखापतही झाली.