Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी १३, २०२२

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली रामाळा तलाव व चांदा किल्ल्याची पाहणी




इको प्रो च्या आंदोलनानंतर चंद्रपूर येथील गोंडकालीन रामाळा तलावाच्या खोलीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, त्याची पाहणी करण्याकरिता राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज 13 फेब्रुवारी रोजी भेट दिली. या भेटीदरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, इको प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची उपस्थिती होती. रामाळा तलाव येथे सध्या खोलीकरण काम सुरू झाले असून, सौंदर्यीकरण करण्याच्या कामासाठी कामामध्ये गती वाढविण्याच्या सूचना आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या. दौर्‍यात त्यांनी चांदा किल्ला येथील बगड खिडकी बुरुजाची पाहणी केली. यावेळी अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांना चंद्रपूर किल्ला पर्यटन दॄष्टिने इको-प्रो च्या स्वच्छता अभियान 'आपला वारसा, आपणच जपुया' ची माहिती जाणून घेतली, पाहणी दौऱ्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मंत्री विजय वडेट्टीवार आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली.





या भेटिदरम्यान मंत्री आदित्य ठाकरे यांना चंद्रपूर शहरातील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात व कमलापूर हत्ती कैम्प बाबत पुनर्विचार करण्याबाबत निवेदन दिले.


आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मिताली सेठी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जराड, ताडोबाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

शहरातील इरई नदी, रामाळा तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरण तसेच जिल्ह्यातील पर्यटन विषयक चर्चा करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांनी वेळोवेळी आढावा बैठक घेतली. तसेच जिल्ह्यातील पर्यटन वाढीच्या दृष्टीने पर्यटन मंत्र्यांना पत्र दिले होते, त्याअनुषंगाने हा दौरा ठरला होता.





शहरातील रामाळा तलाव हा चंद्रपूरचा एतिहासिक वारसा असल्याने अनेक वर्षापासून तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरणाची मागणी होती. असे सांगून पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, रामाळा तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू असून कृषी विभाग व जिल्ह्यातील शेतकरी बांधव यांना शेतीसाठी तलावातील गाळ उपयोगी पडणार आहे. तलावातील गाळ काढण्याच्या कामाला जिल्हा खनिज विकास निधीतून मान्यता देण्यात आली असून 35 हेक्टर क्षेत्रापैकी 30 हेक्टर क्षेत्रात एक मीटर गाळ काढण्याचे काम करण्यात येत आहे. रामाळा तलावाचे काम गतीने पूर्ण करावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.




तसेच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत नदीची भेट देत पाहणी केली. पावसाळ्यात पूर परिस्थितीमुळे नदीचे पाणी शहरात येते व पुरपरिस्थिती निर्माण होते, यासाठी इरई नदीचे सर्वप्रथम खोलीकरण करून रुंदीकरण करणे आवश्यक असुन पाणी अडवण्यासाठी इरई नदीवर बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

तलावाचे पुनर्जीवन करणे, पर्यटनदृष्ट्या विकसित करणे, तलावाजवळील परिसर स्वच्छ व सुशोभित करणे यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे.असे सांगून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, रामाळा तलावाचे काम मे अखेरपर्यंत पूर्णत्वास न्यावे, तलावाचे पाणी स्वच्छ ठेवल्यास इकॉर्निया या जलपर्णी वनस्पतीचा त्रास होणार नाही. तलावातील गाळ नेण्यासाठी शेतकऱ्यांना अवगत करावे. लोकसहभागातून इरई नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी विकासात्मक आराखडा तयार करावा, पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी कुठे वाढते याची माहिती घेऊन संरक्षक भिंतीचे काम करावे. अशा सूचना पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या.

तत्पूर्वी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शहरातील रामाळा तलाव, इरई नदी, बगड खिडकी चांदा किल्ला स्वच्छता मोहिमेची हेरिटेज वॉक करून पाहणी केली.





गडकालिन चांदा किल्ला मॉडलचे आकर्षण; मंत्र्यांनी केले कौतुक


चंद्रपूर शहराला अकरा किलोमीटरचे परकोट लाभले आहे. गोंडकालीन राजवटीमध्ये या किल्ला परकोटाची उभारणी करण्यात आली. त्याची प्रतिकृती इको प्रोचे सदस्य संजय सब्बनवार यांनी साकारली. हे मॉडेल रामाळा तलाव येथे ठेवण्यात आले होते. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी संजय सब्बनवार यांचे कौतुक केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.