Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी १३, २०२२

भावी डॉक्टरला तेली समाजाकडून आर्थिक मदत




संताजी भिसी गृपतर्फे ५१ हजार तर इतर समाज बांधवांकडून वैयक्तिक मदत

Financial support from the Teli community to the future doctor

चंद्रपूर : समाजात शिकण्याची व काहीतरी करून दाखविण्याची धडपळ असते. परंतु आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे कुठेतरी शिक्षणात तडजोड करावी लागते. परंतु समाजातील दानशूरांनी मदत केल्यास शैक्षणिक क्षेत्रातील येणारे आर्थिक अडथळे देखील दूर होऊ शकतात. याच्या प्रत्यय अलीकडेच आलाय, चंद्रपूर स्नेहा वाघमारे हिची निवड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई येथे प्रवेश मिळाला. या भावी डॉक्टरला पुढील शिक्षण घेण्याकरिता संताजी भिसी गृपतर्फे ५१ हजार तर इतर समाज बांधवांकडून वैयक्तिक मदत करून यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

         यावेळी विजय अगडे, राजेश बेले, तिघारे, ताराचंद देऊरमल्ले, डॉ. महेश भांडेकर, व्ही. आर. जे. गृप, रामदास बानकर, सुरेश भुते, राजेंद्र पोटदुखे यांनी वयक्तिक तर संताजी भिसी २०२२ या गृपने ५१ हजार रुपये मदत दिली आहे. आज स्थानिक भिवापूर वार्ड येथील साई मंदिर येथे छोटेखानी कार्यक्रमात स्नेहा वाघमारे हिच्या सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सूर्यकांत खनके, नगरसेवक देवेंद्र बेले, नामदेव वरभे, गोविल मेहरकुरे, माजी नगरसेवक आकाश साखरकर,  सचिन कुंभलकर, शेखर जुमडे, बिजवे, निलेश बेलखंडे, शैलेश जुमडे, राजेंद्र रघाताटे, जितेंद्र इटनकर, नितेश जुमडे, रवी लोणकर, विकास घटे, अनिल आंबोरकर, विनोद कावळे यावेळी उपस्थिती होते. 

                                   आपण ही तेली समाजाच्या वतीने मला केलेल्या मदतीला प्रेरित होऊन डॉक्टर झाल्यावर समाजातील गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी व  रूग्णांची मदत करित राहिल असा निर्धार स्नेहा वाघमारे हिने केला आहे. 
                                                   भविष्यातही अशा प्रकारे तेली समाजबांधव उच्च शिक्षणासाठी आर्थिक अडचणीत असल्यास समाज बांधव मदत करतील, अशी ग्वाही यावेळी तेली समाज बांधवानी दिली.


Financial support from the Teli community to the future doctor

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.