Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी १६, २०२२

नजुलच्या जागेवर बसलेल्या नागरिकांना स्थायी पट्टे द्या



नजुलच्या जागेवर बसलेल्या नागरिकांना स्थायी पट्टे द्या


भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनोज पोतराजे यांची मागणी


■ आ. सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन

चंद्रपुर चंद्रपूर शहरातील इंदिरानगर, कृष्णा नगर, संजय नगर, श्याम नगर, बंगाली कॅम्प मागील ४० वर्षापासून नजुल च्या जागेवर बसला आहे. मात्र अजूनही त्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात आले नसल्याना शासनाच्या योजना पासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकाना स्थायी पट्टे देण्याचे अभियान राबवा या मागणीचे निवेदन भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनोज पोतराजे यांनी लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा माजी कॅबिनेट मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले.

चंद्रपूर शहरातील अती मागास परिसर म्हणून ओळखल्या जाणारा इंदिरानगर, कृष्णा नगर, संजय नगर, श्याम नगर, बंगाली कॅम्प हा भागनजूलच्या जागेवर बसला आहे. मागील ३५ ते ४० वर्षापासून या जागेवर नागरिक वास्तव्यास असतांनानही त्यांना अद्यापही स्थायी स्वरुपी पट्टे मिळाले नसल्याने जवळपास हजारो लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजना शैक्षणिक व बँक या सह अनेक शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून त्यांना त्यांच्या हक्क अधिकारांपासून वंचित ठेवल्याचा हा प्रकार आहे. या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत परिसरातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी जागेचे पट्टे त्वरित तयार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावे. शासनाच्या योजना पासून वंचित असलेल्या नागरीकाना न्याय द्यावा अन्यथा प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाचा विरोध करून आंदोलन करावे लागेल. असे आवाहन भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनोज पोतराजे यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.