Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी १५, २०२२

भाजपचे महाविकास आघाडी सरकारचे विरोधात महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा.माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले नेतृत्व.


महिनाभरात विजेची समस्या सोडविली नाहीतर रस्त्यावर उतरून जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्याचा दिला  इशारा.


संजीव बडोले 
जिल्हा प्रतिनिधी गोदिया.
नवेगावबांध दि.१५ फेब्रुवारी:-
सडक अर्जुनी तालुक्यातील देवरी येथे महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष अर्जुनी-मोर विधानसभातर्फे माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयावर विराट मोर्चा काढून महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारने येत्या महिन्याभरात वीजेच्या समस्या सोडविल्या नाहीत तर संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात  भाजपातर्फे रस्त्यावर उतरत सरकारला सडो की पळो करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. 
असा इशारा आज महाविकास आघाडी सरकारला देण्यात आले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या जुलमी राजवटित महावितरणचा अतिशय भोंगळ कारभार सुरू आहे.शेतात उभ्या असलेल्या पिकांकडे दुर्लक्ष करीत बिनबोभाटपणे विजतोडणी सुरू आहे.सहा-सात महिने मागणी करूनसुद्धा ट्रान्सफॉर्मर मिळत नाही.कृषीपंपाचे मीटर रिडींग प्रमाणे विजेची आकारणी करण्यात येत नाही आहे.गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असुनही गडचिरोली जिल्हा प्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा चोवीस तास वीज पुरवठा करण्यात येत नाही. आता शेतात पाणी असुनसुद्धा वीजवितरण महामंडळाच्या भोंगळ नियोजनामुळे जगावे की मरावे या परिस्थितीत शेतकरी आहे.राज्यातील ठाकरे सरकार हेजनतेच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.राज्यसरकारच्या तुघलकी वृत्तीमुळे शेतकरी पेटून उठला आहे.
आजच्या मोर्चाला माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले,भाजप प्रदेश सचिव माजी आमदार श्री.संजय पुराम,आमदार डाॅ.देवराम होळी यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,नगरसेवक,भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.