संघाचे प्रांत सेवा प्रमुख सूनीलजी मेहर यांच्या हस्ते पूजन करुन शुभारंभ
गोपाळराव बाटवे स्मृती प्रित्यर्थ डॉ अमित बाटवे यांच्या मार्फत चालणार चलचिकित्सालय
सावली तालुक्यातील दोनाडा (उपरी) येथे गोपाळराव बाटवे स्मृती प्रित्यर्थ फिरते चिकित्सालयाचा शुभारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सेवा प्रमुख सूनीलजी मेहर यांच्या हस्ते पूजन करुन करण्यात आला.
यावेळी भालचंद्रजी बाटवे, डॉ अमित बाटवे, छत्रपती चलाख, यांचेसह दोनाडा (उपरी येथिल ग्रामस्थ उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन खापरी नागपूरच्या मार्फत व्याहाड येथील डॉक्टर अमितजी बाटवे यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली असून त्या माध्यमातून सावली तालुक्यातील दोनाडा (उपरी) येथे गोपाळराव बाटवे स्मृती प्रित्यर्थ फिरते चिकित्सालय दर गुरुवार व शनिवारला दूपारी १२ ते ३ वाजता दरम्यान सुरू करण्यात येणार आहे. त्यातून स्थानिक दोणाडा परिसरातील लोकांना वैद्यकिय सेवा मिळणार आहे.
दोनाडा परिसरातील नागरिकांना वैद्यकिय उपचारासाठी नेहमी १५ ते २० किमी बाहेर जावे लागते. त्यामूळे अनेकदा रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही सेवा देता यावी करीता सदर चलचिकित्सलय सूरू करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर अमितजी बाटवे यांनी यावेळी दिली.