माता महाकाली मंदिरात निर्माल्याचे सदुपयोग; अगरबती व कंपोस्ट खतासाठी वापर
Good use of Nirmalya in Mata Mahakali temple; Use for agarbati and compost manure
माता महाकाली मंदिर चंद्रपुर येथील आराध्य दैवत आहे. येथे रोज हजारोच्या संख्येने भाविक येतात. रोज हजारो पुजेदरम्यान फुलहार देवीला अर्पण केला येतो. त्यामुळे इथे निर्माल्य मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. त्याची विल्हेवाट लावणे फार अवघड असते. पण महाकाली मंदिरचे ट्रस्टी सुनील महाकाले यांनी त्या निर्माल्याची विल्हेवाट योग्य रित्या व्यवस्था केली आहे. त्यांनी हे निर्माल्य बचत गट महिलांना व वन धन नर्सरी यांना ते निर्मात्य देऊन त्या निर्माल्यचे रूपांतर अगरबती व कंपोस्ट खत तयार करण्यामध्ये उपयोग केला जात आहे. यात सुनील चन्ने यांचा विशेष सहभाग असून संपूर्ण मंदिर ट्रस्ट हा उपक्रम राबवित आहे. दरम्यान, आज 16 फेब्रुवारी चंद्रपूर मनपाच्या झोन सभापती छबू वैरागडे व सौ. निमिशा महाकाले यांच्या उपस्थितीत निर्माल्य गोळा करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.