Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी १५, २०२२

पद्मगंधा प्रतिष्ठान मराठी भाषा साहित्य संमेलन २७ आणि २८ फेब्रुवारी २०२२ रोजी



पद्मगंधा प्रतिष्ठान मराठी भाषा साहित्य संमेलन







विदर्भातील लोकाश्रित,लोकमान्य साहित्य संस्था. पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीने श्री शंकरराव जाधव पुरस्कृत मराठी भाषा साहित्य संमेलन यंदा आभासी व्यासपीठावर दिनांक २७ आणि २८ फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात येणार आहे.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या वार्षिक साहित्य संमेलनाचे उद घाटन, मा. डॉ .श्री ठाणेदार ,(साहित्यिक - उद्योगपती अमेरिका) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी मा. डॉ.सदानंद मोरे (सुप्रसिद्ध साहित्यिक पुणे) तसेच विशेष अतिथी विद्यावाचस्पती मा.डॉ.स्वानंद पुंड (साहित्यिक यवतमाळ)  आभासी व्यासपीठावर उपस्थित राहणार असून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मा.डॉ. उज्ज्वला चक्रदेव ( कुलगुरू मुंबई विद्यापीठ ) या आहेत.
   यावेळी राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
   मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने दुसऱ्या सत्रात लोककला उत्सव संपन्न होणार असून यात दिंडी,ओवी,अभंग,भारुड,गोंधळ ,लोकगीत ,लावणी असे विविध साहित्य प्रकार पद्मगंधा प्रतिष्ठान चे सदस्य सादर करणार आहेत.
   तिसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित केले असून या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी मा संजीवनी बोकील या आहेत.विविध भागातील प्रसिद्ध कवी आपल्या काव्यरचना यात सादर करतील 
    २८ फेब्रुवारीला साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मा.प्रवीण दवणे यांच्या अध्यक्षतेखाली ' काव्यातून घडणारे स्त्री संत साहित्य दर्शन' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून रेखा नार्वेकर,अलका दामोदरे,किरण डोंगरदिवे ,आणि डॉ राम बोडेवार या वक्त्यांचे विचार आभासी व्यासपीठावर व्यक्त केले जातील.
   दुसऱ्या सत्रात मेघना साने मुंबई प्रस्तुत कथा काव्य नाट्य संगीत यांची सुरेल मैफल असलेला देश विदेशात लोकप्रिय झालेला संस्कार आणि मूल्ये जपणारा कार्यक्रम ' कोवळी उन्हे ' सादर करण्यात येणार आहे.
  तसेच कवी कट्टा अंतर्गत काव्य लेखन आणि अलक लेखन हा उपक्रम घेण्यात येणार आहे.
   श्री शंकरराव जाधव पुरस्कृत मराठी भाषा साहित्य संमेलनचा हा कार्यक्रम आभासी व्यासपीठावर संपन्न होणार असून हा पद्मगंधा प्रतिष्ठानच्या फेसबुक पेज वर यू ट्यूब लिंकच्या माध्यमातून संपन्न होणार आहे असे पद्मगंधा प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष मा.विजया ब्राह्मणकर यांनी कळवले आहे.
          

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.