नायलॉन मांज्यामुळे जख्मी झालेल्या दुर्मिळ घुबड जातीच्या पक्ष्याला कारागृह अधीक्षकांच्या तत्पुरतेमुळे मिळाले जिवदान
या संपुर्ण सजीव सृष्टीमध्ये मनुष्य हा सर्वात बुध्दीमान प्राणी आहे. त्यातही मनुष्य स्वभाव हा दयाभावना व माणुसकीच्या गुणासाठी ऒळखला जातो. मनुष्याच्या याच गुणाचा प्रत्यय आज चंद्रपूर जिल्हा कारागृह परिसरात आला. कारागृहातील अधीक्षक निवासस्थान परिसरातील एका झाडाला एक दुर्मिळ होत चाललेले व घयाळ झालेले घुबड जातीचे पक्षी पंतगीच्या मांझ्यामध्ये अडकून वेदनेने निपचित लटकलेल्या अवस्थेत होते. सदर पक्ष्याच्या एका पंखाला मांज्यामुळे गंभीर दुखापत झाल्याने ते उडू शकत नव्हते. झाडावर लटकलेल्या पक्ष्याच्या भक्षस्थानी पाडण्यासाथी झाडाखाली भटके कुत्रे घेराव करुन भूंकत असल्याने भयभित होऊन घुबड पक्ष्याने जगण्याची उमेंदच हरविलेली होती. तेवढ्यातच हे दृष्य कारागृहाचे अधीक्षक श्री. वैभव आगे यांना दिसले व त्यांनी क्षणाचाही विलंब न करता कारागृहाचे शिपाई श्री.श्रीधर येरमे यांचे सहायाने त्वरीत सदर पक्ष्याला मांज्यातून सोडविले व सदर पक्ष्याला उचलून त्यास पाणी पाजले, त्याच्या पंखावरील जखमेवर औषध लावले व त्याला निवासस्थान परिसरातील पेरुच्या झाडावर ठेवले. तसेच गंभीर दुपाखतीमुळे व घुबड पक्ष्याच्या पंखाभोवती मांजा गुंडाळले गेले असल्याने ते उडू शकत नव्हते करित त्वरीत स्थानिक प्यार फाऊंडेशनचे पक्षीमित्रांच्या रेस्क्यू टिमला संपर्क करुन घुबड पक्ष्याला सुखरुप त्यांच्या ताब्यात दिले त सदर पक्ष्याच्या योग्य उपचारानंतर नैसर्गिक अधिवासात सोडावे अशी पक्षीमित्रास विनंती केली. यावेळी प्रतिक्रीया देतांना कारागृह अधीक्षक श्री. वैभव आगे म्हणाले की, चंद्रपूर जिल्हा पशू पक्ष्यांच्या अधिवासासाठी जगभरात प्रसिध्द असल्याने चंद्रपूर जिल्यात जगभरातून पर्यटक येथील जंगलातील पशु पक्ष्यांच्या मुक्त संचार बघण्यासाठी येत असतात परंतू नायलॉन मांज्याच्या वापरामुळे या पशु पक्ष्यांच्या जिवीतास धोका निर्माण झालेला आहे ही आपल्यासाठी निश्चितच अभिमानास्पद बाब नाही.