Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०२२

Koo appचे लाइव्ह व्हिडिओ फीचर; युजर्स करताहेत प्रभावीपणे उपयोग




'कू' अॅप घेऊन आलेय खास नवे फीचर्स, युजर्स करताहेत प्रभावीपणे उपयोग




नवी दिल्ली,: सोशल मीडियाच्या क्षेत्रात अनेक नवीन फीचर्सची गरज असते आणि भारतासारख्या विविधतेत नटलेल्या देशात, प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी प्रथम बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म- Koo app, सादर करण्यात आले. अगदी सुरुवातीपासून ते आतापर्यंतच्या छोट्या प्रवासातच यशाचे सगळे विक्रम गाजवणाऱ्या Koo Appने देशातील पारंपरिक सोशल मीडिया युजर्सपासून नवीन युजर्सना अनेक फीचर्स दिली आहेत, ज्यांची माहिती घेणे रंजक आहे.
टॉक टू टाइप फीचर
Kooचे अनोखे "टॉक टू टाइप" वैशिष्ट्य खूप छान आहे. म्हणजेच कोणताही युजर आता आपले विचार टाईप न करता सहजपणे पोस्ट करू शकतो. कू अॅपमधील न्यू मेसेजवर क्लिक केल्यानंतर, टेक्स्ट बॉक्सच्या तळाशी एक बोलणाऱ्या माणसासारखे बटण असते, त्यावर क्लिक केल्यावर, युजर त्याचे शब्द मोबाईलवर मोठ्याने बोलू शकतो आणि त्याचे बोललेले शब्द जादू झाल्यासारखे स्क्रीनवर दिसतील. आणि हे सर्व एका क्लिकवर आणि कीबोर्ड न वापरता केले जाते. हे वैशिष्ट्य त्या सर्व भारतीय भाषांमध्ये आहे, ज्यामध्ये कू अॅप सध्या उपलब्ध आहे, म्हणजे 10 भाषा. हे फीचर मूळ भारतीय भाषेतील लोकांना आपले विचार सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे.
येथे हे जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे की कू हे "टॉक टू टाइप" वैशिष्ट्य वापरणारे जगातील पहिले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, तेही इंग्रजीशिवाय इतर भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये. हे लाखो कू वापरकर्त्यांना त्यांच्या प्रादेशिक भाषेत सर्वात सोप्या पद्धतीने व्यक्त होण्यास सक्षम करेल. अनेक वापरकर्ते जे कीबोर्ड वापरू शकत नाहीत त्यांना या फीचरद्वारे त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सक्षम आणि सशक्त केले जाईल.

MLK फीचर म्हणजे अनेक भाषांमधील भाषांतराची सुविधा
वास्तविक, कू अॅप हे मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म भारतीयांना त्यांच्या मूळ भाषांमध्ये व्यक्त होण्याचा आणि चर्चा करण्याचा अधिकार देतो. तसेच कोणत्याही भाषेतील चांगल्या गोष्टी आणि वेगवेगळ्या भाषिक समुदायांना त्यांच्या उपयोगाच्या आणि कामाच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचणंसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन, Koo App ने MLK म्हणजेच Multi-Lingual Koo (बहुभाषिक कू) फीचर सादर केले. या प्रकारच्या पहिल्याच फीचरसह, Koo App हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ, आसामी, बंगाली, तेलुगु, पंजाबी, गुजराती आणि इंग्रजीमधून कोणत्याही एका भाषेतील संदेशांचे उर्वरित नऊ भाषांमध्ये त्वरित भाषांतर करू शकते. या फीचरचे एक आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे मूळ मजकूर म्हणजेच संदेशाशी संबंधित संदर्भ आणि भावना इतर भाषांमध्ये देखील सारखीच राहते आणि मेसेज रिअल टाइममध्ये अनेक भाषांमध्ये अनुवादित केला जातो. यामुळे देशभरातील लोकांना त्यांच्या आवडीच्या भाषेत संदेश पाहता येतो आणि युजर्सचा रीच वाढतो , ज्यामुळे कमी कालावधीत कंटेंट क्रिएटर्सची फॉलोअरशिप वाढते. कू अॅप हे तंत्रज्ञान-चालित भाषांतर फीचर सक्षम करणारे जगातील पहिले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.


लाइव वीडियो
Koo appचे लाइव्ह व्हिडिओ फीचर यूजर्सना कोठेही आणि कधीही त्यांच्या फॉलोअर्सशी थेट कनेक्ट होण्याची सर्वोत्तम संधी देते. हे उत्कृष्ट फीचर यूजर्सना त्यांच्या प्रेक्षकांशी संवाद साधण्याची तसेच त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी देते, ज्यामुळे परस्पर कनेक्टिव्हिटी वाढते आणि एंगेजमेंटदेखील वाढते. लाइव्ह व्हिडिओ फीडद्वारे, यूजर्स एकाच वेळी त्यांच्या सर्व दर्शकांसोबत त्यांच्या मनातील गोष्टी शेअर करू शकतात.


एक्सक्लुजिव कू
या स्वदेशी मायक्रो-ब्लॉगिंग अॅपचे एक्सक्लुसिव कू फीचर यूजर्सना त्यांच्या पोस्ट वेगळ्या पद्धतीने दाखवण्याची संधी देते. तथापि, हे वैशिष्ट्य वापरताना, वापरकर्त्यांना खात्री करावी लागेल की त्यांच्या पोस्टमध्ये दिलेली माहिती, फोटो, व्हिडिओ म्हणजेच कंटेंट यूनीक आहे आणि याआधी इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेली नाही. या एक्सक्लूसिव कू द्वारे, यूजर्स हे जाहिर करू शकतात की ते पोस्ट करत असलेला कंटेंट ओरिजनल आहे तसेच कोणत्याही सोशल मीडियावर प्रथमच पोस्ट केला आहे. यामुळे यूजर्सचा कंटेंट पाहणाऱ्या आणि आवडणाऱ्या लोकांची संख्या वाढते, ज्यामुळे त्यांचे फॉलोअर्स वाढण्यासही मदत होते, कारण सोशल मीडियावरील प्रेक्षकांना चांगली ओरिजनल आणि यूनीक कंटेंट आवडतो.


पर्सनल चॅटिंग
कू अॅपमध्ये आणखी एक उत्तम फीचर देण्यात आले आहे जे यूजर्स आणि त्यांच्या फॉलोअर्सना चॅटिंग करण्याची संधी देते. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे चॅटिंग गुप्त म्हणजे सीक्रेट राहतं. यासाठी फॉलोअर्सकडून युजर्सला चॅट रिक्वेस्ट पाठवली जाते आणि मेसेज बॉक्समध्ये जाऊन युजरने परवानगी दिल्यावर दोघांमध्ये वैयक्तिक चॅटिंग सुरू होते. जर वापरकर्त्याची इच्छा नसेल, तर त्याने कोणत्याही अज्ञात किंवा इतर अनुयायांची चॅटिंग रिक्वेस्ट स्वीकारू नये आणि यामुळे चॅटिंग शक्य होणार नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणत्याही व्यक्तीशी, पेजशी, कंपनीशी, सेलिब्रिटीशी किंवा इतरांशी काही वैयक्तिक बोलायचे असते तेव्हा त्याचा फायदा होतो.


डायरेक्ट ट्रेंडिंग मैसेज
देशातील या अनोख्या सोशल मीडिया अॅपचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे डायरेक्ट ट्रेंडिंग मैसेज. हे फीचर तुम्हाला कू वर चालू असलेल्या कोणत्याही हॅशटॅग ट्रेंडमध्ये सामील होण्यास आणि त्याच्याशी संबंधित संदेश पाठविण्यास सक्षम करते. यासाठी, यूजर्सना अॅपवर जाऊन # म्हणजे टॉप ट्रेंड बटणवर क्लिक करावे लागेल आणि तेथे दिसणार्‍या कोणत्याही ट्रेंडच्या बाजूला असलेल्या प्लस (+) चिन्हावर क्लिक केल्यास त्या ट्रेंडसह एक मेसेज बॉक्स उघडेल. मग काय, यूजर त्याचा संदेश टाइप करून किंवा बोलून लिहू शकतो आणि अनुवादाची चिंता न करता त्याच्या भाषेत किंवा इतर सर्व भाषांमध्ये पोस्ट करू शकतो.


टॉप आहे टॉपिक
कू चा टॉपिक सेक्शन आतापर्यंत आलेल्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्याचा टॉपिक सेक्शन टॉप आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कू अॅपच्या होम पेजवर, वरच्या मध्यभागी, कू बर्डच्या खाली टॉपिक सेक्शन दिसतो. त्यावर क्लिक केल्यावर, यूजर्सना प्रथम टॉप टॉपिक्स दिसतील, ज्यासमोर या टॉपिक्सना थेट फॉलो करण्याचा पर्याय आहे. दिवसभरातील असे सर्व टॉपिक्स त्यात दिलेले आहेत, ज्यावर यूजर्स चर्चा करत असतात. खाली स्क्रोल केल्यावर view more म्हणजेच आणखीन बघाचा पर्याय देखील येतो. यानंतर टॉपिक्सच्या कैटेगरीज खाली दिल्या आहेत, नंतर खाली पीपल म्हणजे लोक, मग ऑर्गनाइजेशंस, नंतर स्टेट्स एंड सिटीज आणि नंतर ट्रेंडिंग टॉपिक्स विषय दिसतात. म्हणजेच दिवसाच्या कोणत्या वेळी कोणत्या विषयांवर चर्चा होते हे जाणून घेण्यासाठी टॉपिक सेक्शन आपल्याला पूर्ण मसाला पुरवतो.


अद्वितीय लाइक बटण
या बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या प्रत्येक पोस्टच्या तळाशी दिसणारे लाईक बटण देखील अप्रतिम आहे. बाकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या विपरीत, हे लाईक बटण ब्लिंक करताना दिसते, म्हणजे थोडासा फुगवटा आहे. या मागील कारण म्हणजे Koo च्या माध्यमातून सोशल मीडियावर येणाऱ्या नवीन युजर्सना हे बटण एंगेजमेंट वाढवण्यासाठी आणि इतर पोस्टसाठी लाईक करायला शिकवणे. या बटणामुळे,  युजर्सचे देखील पोस्टकडे लक्ष वेधले जाते आणि ते पोस्ट काळजीपूर्वक पाहू शकतात, ज्यामुळे लाइक्स वाढण्याची आणि एंगेजमेंट वाढण्याची शक्यता अधिक असते.


डार्क थीम
कू अॅपमध्ये डार्क थीमचे फीचरही देण्यात आले आहे. यासाठी अॅपच्या वरती डावीकडे दिलेल्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करा. त्यानंतर उजवीकडे वरच्या बाजूला असलेल्या सेटिंग्ज बटणवर क्लिक करा. यामध्ये, वरून तिसरे फीचर थीमचे आहे. येथे थीमचे तीन पर्याय डार्क, लाइट आणि सिस्टम उपलब्ध आहेत. डार्क थीम निवडल्यावर, अॅपची बॅकग्राऊंड काळी आणि टेक्स्ट पांढरा होतो. हे युजर्सना पोस्टवर अधिक फोकस करू शकतात आणि डोळ्यांना थोडा आराम देखील देते. याचे आणखी एक मोठे वैशिष्टय़ म्हणजे डार्क थीम वापरल्याने फोनच्या बॅटरीचा वापरही कमी होतो, कारण बहुतांश स्क्रीन काळी राहते आणि प्रकाशाची आवश्यकता नसते.

चॅट रूम
या स्वदेशी अॅपमध्ये यूजर्सना चॅट रूमचा पर्यायही देण्यात आला आहे. Koo appच्या होम परवर खाली स्क्रोल करताना हा पर्याय दिसतो. चॅट रूमचा ऑप्शन निवडल्यानंतर, हॉट टॉपिक्स युजर्ससमोर येतात, ज्यावर क्लिक करून युजर्स थेट त्या विशिष्ट विषयाशी संबंधित विषयावर चर्चा करणाऱ्या इतर युजर्सच्या चर्चेत सामील होतात. याचा फायदा असा आहे की युजरला त्याच्या आवडीच्या विषयावर त्या विषयाशी संबंधित फोरममध्ये एकत्र आलेल्या इतर लोकांसमोर त्याचे मत व्यक्त करण्याची संधी मिळते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.