जुन्नर ../आनंद कांबळे
किल्ले शिवनेरीवरील मुख्य शिवजन्म सोहळ्याच्या शासकीय कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे,राज्यमंत्री आदिती तटकरे,जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे ,उपाध्यक्ष रणजित शिवतारे, खासदारअमोल कोल्हे ,जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
शिवजयंती उत्सवाच्या नियोजनासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार अतुल बेनके ,तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी ही माहिती दिली .
अनिल अवचट यांना मरणोत्तर छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार तर शिवनेरभूषण पुरस्कार दुर्गसंवर्धक विनायक खोत यांना जाहीर करण्यात आला आहे.
पंचायत समितीच्या वतीने दिं १४ रोजी चित्र कला स्पर्धा,दिं १५रोजी निबंध स्पर्धा,दिं १६रोजी वक्तृत्व स्पर्धा,दिं १५ते१७रोजी बुद्धीबळ स्पर्धा,दिं १८ रोजी शिवनेरी गड चढण स्पर्धा, पोवाडा गायन स्पर्धा,रांगोळी स्पर्धा लोकनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.दिं १८व१९रोजी प्राचीन नाणी संग्रहाचे प्रदर्शन संपन्न होणार आहे.दिं १८रोजी दुपारी 3 वाजता बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे.तसेच दिं १४ते १९या काळात फेसबुक लाईव्ह व्याख्यान माला सँप्पन होणार आहे. पर्यटन संचलनालयाच्या वतीने दिं १८ते२०या कालावधीत द्राक्ष महोत्सव ,सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.दिं १८रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन जुन्नर येथे होणार आहे.दिं १८रोजी मालती इनामदार यांचा तसेच दिं १९रोजी विठाबाई नारायणगावकर लोकनाट्य तमाशा कार्यक्रम जुन्नर येथे संपन्न होणार आहे.दिं १९ रोजी दुपारी ३वाजता शिवनेर चषक कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे . आमदार अतुल बेनके पुढे म्हणाले,शिवनेरीवरील शिवजयंती उत्सवासाठी एक कोटी निधीची मागणी शासनाकडे केली आहे. शासनाकडे सादर करण्यात आला आहे. मागील वर्षी मंजूर करण्यात आलेल्या 23 कोटी रकमेपैकी सार्वजनिक बांधकाम , वन विभाग व पुरातत्व विभागाची कामे सुरु आहेत शिवजयंती निमित्ताने राज्यभरातुन येणाऱ्या शिवप्रेमीना शिवज्योत नेण्यासाठी मुक्त प्रवेश आहे.परंतु१९
फेब्रुवारी रोजी शिवजन्म सोहळ्याच्या मुख्य शासकीय कार्यक्रमासाठी सकाळी ६ते१० या वेळेत केवळ प्रवेश पत्र धारकांना उपस्थित रहाता येईल. शिवनेरीकडे जाणारा दोन्ही मार्गावर एकेरी वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे. असे आ अतुल बेनके यांनी सांगितले. *
शिवजयंती उत्सवाच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार अतुल बेनके ,तहसिलदार रविंद्र सबनीस