नगरसेविका सौ. कल्पनाताई के. बगुलकर तर्फे आयोजित मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात !
बाबुपेठ येथे नगरसेविका कल्पनाताई बगुलकर यांच्यातर्फे महिला मेळावा
एकमेकांच्या विचारांची देवाण घेवाण करता यावी, यासाठी नगरसेविका कल्पनाताई बगूलकर यांच्या पुढाकाराने बाबुपेठ येथे महिला मेळावा आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हसंराज अहीर व महापौर सौ राखीताई कंचर्लावार यांची उपस्थिती होती.
माजी सभापती व नगरसेविका सौ कल्पनाताई के बगूलकर यांनी प्रस्तावित करतांना म्हाणाले कि, "निवडून आल्यापासून 5 वर्षात, जनतेची केलेल्या सेवा कार्याची माहिती दिली आणी आपल्या वार्डाच्या विकासासाठी आत्तापर्यंत सिमेंट काँक्रीट रोड नालीच्या बांधकामासाठी तसेच पाणीपुरवठा संबंधित हात पंप बोरिंग व ट्यूबवेल या सर्व कामासाठी संपूर्ण वार्डात माझ्या प्रयत्नातून 4 कोटी रुपयांचे काम झाले."
माजी केद्रींय गृहराज्यमंत्री मा. हसंराजभैय्या अहीर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, "नगरसेविका सौ कल्पनाताई के. बगुलकर यांच्या द्वारे आयोजित बालाजी मंदिर बाबूपेठ येथे हळदीकुंकू कार्यक्रमाला संबोधित केले. महाराष्टीतील हा महत्वाचा सण आहे म्हणून महिला मंडळ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने व स्वच्छ भावनेने घेतात, हळदी कुंकू या परंपरेला अबाधित ठेवण्यासाठी महिलांना शुभेच्छा दिल्या."
महापौर सौ राखी कंचलवार म्हणाले की, "नगरसेविका कल्पनाताई वार्डातील समस्या घेऊन नेहमी येत असतात तसेच सुधीर भाऊ व हसंराजभैय्या कडे सुद्धा आपल्या वार्डातील समस्या जाऊन सोडवून घेतात तसेच नेहमी जनतेच्या कामात सहकार्य करतात व आपल्या वार्डाच्या विकासासाठी सुद्धा त्यांनी भरपूर कामे केली आहेत समोर सुद्धा होणार आहे. महिलांना आव्हान केले की प्रत्येकाने आपल्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करावी जेणेकरून भूगर्भतील पाण्याची पातळी टिकून राहील समोर भविष्यात पाण्याची समस्या येणार नाही कारण आजही काही ग्रामीण भागात महिला पाण्यासाठी पायपीट करताना दिसते तिथे आत्ताही पाण्याची समस्या आहे"
भाजपा महिला आघाडी महामंत्री व नगरसेविका सौ शिलाताई चव्हाण यांनी व्यक्त केले कि, "कोरोनाच्या काळात कल्पनाताईनी मा. सुधीरभाऊ व मा. हंसराज भैय्या यांच्या माध्यमातून व स्वतः केलेल्या धान्य किट व फूड पाॅकीट वाटप केलेल्या सेवा कार्याने अनेक गरिबांना कोरोना काळात मदत केली, असेच सेवाकार्य करणारी महिला नगरसेविका पुन्हा पाहिजे असेल तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत 2022 मध्ये कल्पनाताईला बहुमताने विजयी करा."
डॉक्टर मनीषा घाटे यांनी महिलांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात मिळणाऱ्या कॅन्सर आजारावर संपूर्ण महिलांना या प्रसंगी मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
या शुभ प्रसंगी मुलींचे डान्स कॉम्पिटिशन झाले तसेच बक्षीस वितरण सुद्धा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
या कार्यक्रमास प्रामुख्याने झोन सभापती सौ छबुताई वैरागड, नगरसेवक श्याम कणकम, प्रदीप किरम, नगरसेविका सौ. माया उईके तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमास परिसरातील ६०० पेक्षा जास्त महिलांचा समावेश होता.