व्हॅलेंटाईन दिनी इको प्रो व एफइएसच्या विद्यार्थींनींनी गोंडराजे बिरशहा व राणी हिराई यांच्या समाधीवर टेकला माथा
चंद्रपूर । व्हॅलेंटाईन दिनानिमित्त शहरातील गोंडकालीन ऐतिहासिक वास्तू असलेल्या गोंडराजे बिरशहा व राणी हिराई यांच्या समाधीवर इको प्रो कार्यकर्ते व एफइएसच्या विद्यार्थींनींनी माथा टेकला. "आपला वारसा, आपणच जपूया" अभियान अंतर्गत समाधीस्थळावर पुष्पअर्पण करून कार्यक्रम साजरा केला.
आजच्या युवकांना प्रेमदिनाच्या निमीत्ताने पाश्चिमात्य देशातील अनुकरण न करता प्रत्येक नात्यातील प्रेम वृध्दीगंत करण्याकरिता योग्य संदेश देता यावा, यासाठी इको प्रोच्या वतीने दरवर्षी गोंडराजे यांचे समाधीस्थळावर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गोंडराजे बिरशहा यांची समाधी राणी हिराईने त्यांच्या मृत्युनंतर बांधली. ताजमहलनंतर त्याच तोडीची गोंडवनातील सुंदर आकर्षक अशी वास्तू म्हणून ओळख आहे. राणी हिराईने आपल्या कार्यातून पतीप्रती असलेले प्रेम अजरामर केले. राणी हिराईचा हा आदर्श आजच्या युवकांनी-युवतीनी घेण्याची गरज आहे.
चंद्रपूर शहरात असलेली ही प्राचीन पुरातन वास्तु खऱ्या अर्थाने आपला वारसा संवर्धनाचा तसेच आपल्या कार्यातुन गोंडराजे बिरशहा व राणी हिराई यांच्यातील प्रेम अजरामर करून ताजमहलच्या तोडीची वास्तु निर्माण सोबतच पुढील काळात योग्य राजकारभार करून राणीने एक आदर्श घालुन दिलेला आहे. राणी हिराई आणि गोंडराजे बिरशहा यांच्यातील प्रेमचं होत की जे मृत्युनंतरही अजरामर झाले आहे, त्याच्या कार्यातुन ते सतत जिवंत राहणार आहे असे मत प्रा. डॉ सचिन बोधाने यांनी व्यक्त केले.
आपला ऐतिहासिक वारसा जतन करण्यास स्वतःला पुढाकार घेण्याची गरज असून, "आपला वारसा, आपणच जपुया" या अभियानाला महत्व आहे. तसेच आजच्या दाम्पत्यांनी तसेच युवकांनी अशा स्थळांना, स्मारंकाना भेट देत आपल्या जिवनात, हा आदर्श घेण्याची गरज आहे, ऐतिहासिक वास्तू संवर्धन करिता पुढाकार घेण्याची गरज आहे असे मत यावेळी इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमा चे प्रास्ताविक प्रा डॉ प्रमोद रेवतकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. राजेंद्र बारसागड़े रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी तर आभार प्रा डॉ सुवर्णा कायरकर यांनी मानले. यावेळी प्रा. डॉ मेघमाला मेश्राम, डॉ जुमले मैडम, डॉ जूनघरे मैडम, डॉ कावले मैडम, डॉ ठोम्बरे मैडम, डॉ उमरे, डॉ बंसोड़, डॉ वानखेड़े, प्रा निमागड़े सह इको-प्रो चे नितीन रामटेके, सुनील पाटील, ओमजी वर्मा, धर्मेंद्र लुनावत, आकाश घोड़मारे, विनोद दुधनकर, सचिन धोतरे, कपील चौधरी, योजना धोतरे, भारती शिंदे, मनीषा जैस्वाल, खुशबू जैस्वाल, प्रगती मार्कण्डवार, पूजा गहुकर व पुरातत्व विभाग चे कर्मचारी उपस्थित होते.