चंद्रपूर जिल्ह्यातील सारस संवर्धन करण्यासाठी समितीची स्थापना : प्रा. सुरेश चोपणे यांची माहिती
विदर्भातील सारस पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा अभ्यास सेवा संस्थेने प्रकाशित केला होता. त्याची दखल घेऊन उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश पारित करीत सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सारस संवर्धन व जतन करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती या समितीचे सदस्य प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी दिली.
या समितीमध्ये जिल्हाधिकारी अजय गुल्हाने अध्यक्ष असून, सदस्य सचिव म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांचा समावेश आहे, तर सदस्यांमध्ये विभागीय वन अधिकारी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक, विभागीय वन व्यवस्थापक, सेवा संस्थेचे अंकित सिंग ठाकूर, निमंत्रित सदस्य म्हणून ग्रीन प्लॅनेट चे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश चोपणे आणि इको प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांचा समावेश आहे.
ही समिती जिल्ह्यातील पक्षांचे अस्तित्व व स्थिती आणि र्हासाची कारणे व उपाययोजना सुचविणार आहे.
Establishment of Committee for Stork Conservation in Chandrapur District: