मंगळवारी वाघाच्या बंदोबस्त करण्यासाठी सर्व पक्षीय मोर्चा व उर्जानगर, दुर्गापूर बंदचे आयोजन
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात वाघ, बीबट आणि अन्य वन्यप्राणी वास्तव्य करीत असून, दोघांचा मृत्यू झाला. या विरोधात जनमानसात संताप व्यक्त होत आहे. उद्या मंगळवारी 22 फेब्रुवारी रोजी वाघाचे बंदोबस्त करण्यासाठी सर्व पक्षीय मोर्चा निघणार असून, उर्जानगर, दुर्गापूर बंदचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक दुर्गापूर येथून सकाळी 10 वाजता मोर्चा निघनार असून, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे येईल. वाघाच्या वाढत्या घटनांमुळे हा परिसर भयग्रस्त आहे. वनविभागाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नितिन भटारकर यांनी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, माजी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार यांनी भेटी देवून बैठका घेतल्या आहेत.
Organizing All Party Morcha and Urjanagar, Durgapur Bandh on Tuesday to control the tiger