देशसीमा रक्षणातून निवृत होताच जवानाने घेतली पर्यावरण रक्षणाची धुरा
*19 वर्षांच्या देश सेवेनंतर इको-प्रो मध्ये घेतला सहभाग
चंद्रपूर: देशाच्या रक्षणासाठी विविध भागात तैनात राहून आज १९ वर्षाच्या दीर्घ देशसेवेनंतर निवृत्ती घेतली. उर्वरित जीवन आता सामाजिक कार्यासाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला. श्री राजू सुदाती असे जवानाचे नाव असून, त्यांनी इको प्रो या पर्यावरणप्रेमी संस्थेचे सदस्यत्व स्वीकारले. संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी इको-प्रोचा गणवेश देवून स्वागत केले.
घुघुस येथील युवक श्री राजु सुदाती हे 19 वर्षे सैन्यात देशसेवा करून 31 जाने 2022 रोजी निवृत्त झाले. या निमित्त त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आज 4 फेब्रुवारी रोजी इको-प्रो कार्यालयात पार पडला. सैन्यात राहून देशसेवा केल्याबद्दल शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी राजु सुदाती यांनी इको-प्रो संस्थेचा सक्रीय सदस्य होण्याची इच्छा व्यक्त केली आणि सैन्यात सेवेनंतर आपल्या गावात-शहरात पर्यावरण व सामाजिक कार्यात इको-प्रोचा युनिफार्म धारण करून नवा सैनिकांचे कार्य करण्यास तयार असल्याचे सांगीतले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी या छोटेखानी कार्यक्रमादरम्यान सुदाती यांचे स्वागत करीत, सैन्यातील देशसेवेनंतर सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.
स्वतः बंडू धोतरे यांनी सैन्यात जाऊ न शकल्याने इको-प्रोची निर्मिती केली. शिवाय जे तरुण सैन्यात दाखल होऊ न शकल्याने इको-प्रोत सहभागी झालेत. मात्र, आज प्रत्यक्ष सैन्यात राहून आलेल्या तरुणाने इको-प्रोत आल्याने कार्यकर्त्या मध्ये नवी ऊर्जा आली आहे.
यावेळी सुदाती यांनी सांगीतले की, सेनेत सेवादरम्यान सेना फिल्ड हाॅस्पीटल मध्ये बराच कार्यकाळ गेला आहे. यादरम्यान सियाचिन लदृाख, पटियाला-पंजाब, मनिपुर-इंफाल या देशाच्या सिमारेषेवर कार्य या सेवाकाळात केले आहे. यादरम्यान नेहमीच चंद्रपुरची माहीती घेत असे. यात चंद्रपूर मधिल इको-प्रोची पर्यावरण व सामाजिक चळवळ बघत होतो, पर्यावरण, वन्यजीव संरक्षणासाठी सैनिकांसारखे सिमअंतर्गत ही युवक युनिफार्म धारण करून लढतात हे माझासाठी प्रेरणादायी कार्य होते आणी तेव्हाच विचार केला होता की सेनेतुन निवृत्त झाली की इको-प्रोचा हिरवा सैनिक होणार, आणि आज मला यांचा आंनद होत आहे मी इको-प्रोचा सदस्य झालो आहे. एक यूनिफार्म सेवानिवृत्तिने गेला, मात्र नवा यूनिफार्म मिळाला.
Desh Seema Rakshanatun retired Hotach Jawanane Ghetli Environment Rakshanachi axle