Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी ११, २०२२

10 लाखाची खंडनी मागणाऱ्या माहीती अधिकार कार्यकर्त्यास रंगेहात अटक





फिर्यादी उपकार्यकारी अभीयंता महावितरण गडचांदुर जि . चंद्रपुर यांना आरोपी सौरभ विजय बुरेवार चंद्रपुर याने माहीती अधिकारा अंतर्गात माहीती मागवुन बोगस बिल सादर केल्याबाबतची नविन तकार वरिष्ठ कार्यालयात करणार नाही व आधीची तकार वापस घेने याकरीता १० लाख रुपये खंडणीची मागणी करीत होता परंतु फिर्यादी यांना त्यांना पैसे देन्याची इच्छा नसल्याने त्यांनी मा . पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपुर यांना भेटुन तकार केली त्यावरून मा.पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपुर यानी स्थानिक गुन्हे शाखा , चंद्रपुर येथील पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना कार्यवाही करन्याचे आदेश दील्याने पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पोउपनि अतुल कावळे यांना टीम सह सापळा कार्यवाही करुन आरोपीला रंगेहात पकडन्याचे आदेश दील्याने फिर्यादी उपकार्यकारी अभीयता महावितरण यांना भेटुन आरोपी याने खंडणीची मागणी केल्याची खात्री करून आरोपी याने फिर्यादीस दीनाक १० ०२/२२ ला रोमा बार बेबी लॉन चंद्रपुर येथे भेटायला येणास सांगितले .


तेव्हा रोमाबार लेबी लॉन चंद्रपुर येथे पोउपनि अतुल कावळे यांनी दोन सरकारी पंच व स्थानिक गुन्हे शाखा टीम सह येथे जावुन सापळा रचल आरोपी सौरभ बुरेवार फिर्यादीस बोगस बिल सादर केल्याबाबतची नविन तकार वरिष्ठ कार्यालयात करणार नाही व केलेली तकार मागे घेण्याकरिता तडजोडीअंती ५ लाखची मागणी करून टोकन म्हणुन ५०,००० / - रुपये खंडणीच्या स्वरुपात घेताच त्याला खंडणीच्या रक्कमे सह रंगेहात पकडन्यात आले . व आरोपीस ताब्यात घेवून पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध कमाक ११५/२०२२ कलम ३८४ भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला .

न्यानंतर सदरची यशस्वी कामगीरी मा . श्री . अरविंद साळवे पोलीस अधिक्षक चंद्रपुर अप्पर पोलीस अधिक्षक श्री . अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उप निरीक्षक अतुल कावळे , स.फौ. पंडीत वरह्हाडे , नापोशि मिलींद चव्हान , अनुप डांगे , जमिर पठान , संतोष येलपुलवार , दीपक डोगरे , नितेश महात्मे , पोशि प्रमोद कोटनाके , मयुर येरणे सायबर सेल येथील पो हवा . अली मेजर , पोशि भास्कर यांनी केली .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.