चंद्रपूर, दि.24 जानेवारी : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि. 25 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता चंद्रपूर येथे आगमन व शहरातील वडगाव प्रभाग 8 मध्ये खनिज निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या जेपी सुपर बाजार ते श्री. मुलानी गजानन महाराज सिमेंट काँक्रीट रस्ता व लक्ष्मीनगर सर्वे नं.13/2 मधील जागेच्या सौंदर्यीकरण व विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित. सकाळी 11.45 वाजता चंद्रपूर शहरातील महाकाली (जोडदेऊळ) प्रभाग क्र. 12 (जोडदेऊळ, पठाणपुरा) मध्ये खनिज निधीअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या जोडदेऊळ विठ्ठल रुक्माई मंदिर सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 12.30 वाजता शहरातील बंगाली कॅम्प प्रभाग क्रमांक 4 मधील खनिज निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या महिला शक्ती क्रिडांगणाला वॉल कंपाऊंडचे बांधकाम व संविधान चौक (राजीव गांधी नगर) ते हेल्थ फार्मसी डी.आर.सी रोड पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.15 वाजता चंद्रपूर शहरातील इंडस्ट्रियल इस्टेट प्रभाग क्र. 6 मध्ये खनिज निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या श्री. मनोज परसराम ते श्री. विश्वकर्मा यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे व श्री. सुनीलराव अंबाला यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.
दुपारी 2 वाजता विवेक नगर तुकुम प्रभागांमध्ये खनिज निधीअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या श्री साजिद खान ते ए.एच.शेख, अनवर शेख ते कपिल कुरेशी आणि श्री. वरभे ते राहुल ट्रेडर्स शॉपपर्यंत काँक्रीट रोड व नाली बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.30 ते 3 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जिल्हा नियोजन व विकास समिती अंतर्गत संबंधित विभागातील विकास कामांचा आढावा बैठक. सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे चंद्रपूर जिल्ह्यातील काही गावे एका तालुक्यात येतात व त्यांची ग्रामपंचायत दुसऱ्या तालुक्यात येत असल्याने एकाच तालुक्यात ठेवण्याबाबत आढावा बैठक. सायंकाळी 4.30 वाजता नियोजन भवन सभागृह येथे जिल्हा दिव्यांग अखर्चित निधी मधून नवीन योजना घेण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक. सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर शहरातील कॅन्सर हॉस्पिटल संदर्भात कॅन्सर केअर फाऊंडेशनच्या कामांच्या प्रगतीबाबत आढावा बैठक. सायंकाळी 5.30 वाजता चंद्रपूर शहरातील कॅन्सर हॉस्पिटल संदर्भात कॅन्सर केअर फाऊंडेशनच्या कामांच्या प्रगतीबाबत कामाची पाहणी. सायंकाळी 6.30 वाजता होटेल सिद्धार्थ प्रेमियर, चंद्रपुर येथे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. रात्री 8.30 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथे आगमन व मुक्काम.