Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जानेवारी ०२, २०२२

समारंभावर निर्बंध; मात्र चंद्रपूरच्या संडे मार्केटमध्ये तुफान गर्दी #SundayMarket

अचानक कोविड रूग्णांची संख्या वाढू लागण्याने राज्य सरकारने कठोर निर्बंध लादले. समारंभ आणि राजकीय कार्यक्रमावर संख्येबाबत निर्बध घालून देण्यात आले. मात्र, चंद्रपूर शहरातील आझाद बगीचाजवळ दर रविवारी भरणाऱ्या संडे मार्केट मध्ये तुफान गर्दी दिसून आली. 



मुख्य रस्त्यावर होणारी गर्दी लक्षात घेता काही महिन्यापूर्वी संडे मार्केटवर बंदी घालण्यात आली होती. कोरोनाच्या काळात लाकडाऊन मध्ये हे मार्केट बंद होते. मात्र, टाळेबंदी उठताच पुन्हा संडे मार्केट फुलून आला. चंद्रपूरच्या या संडे मार्केटमध्ये मोठी गर्दी होत असून, विनामास्क, आणि कोरोना नियमाचे उल्लंघन झाले आहे. जिल्हा प्रशासन कोविड लसिकरणावर भर देत आहे. लसिकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी लकी ड्रा सारखे उपक्रम राबविले.मात्र आजची गर्दी बघता ओमायक्राॕन व्हेरीऐंटचा संकटा बद्दल शहरवासीय गंभीर नसल्याचे  दिसले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.