गोंदिया आणि भंडारा सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते धनेंद्र भूरले यांच्यावर आज शुक्रवारी(ता. 28) सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास अनोळखी दोन व्यक्तींनी गोळीबार केला. धनेंद्र भूरले अत्यवस्थ असून त्यांना शासकीय रुग्णालयातून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोंदिया-भंडारा जिल्ह्यात अनाथ लोकांसाठी प्रा. संविता बेदरकर काम करतात. त्यांचे पति धनेंद्र भुरले त्यांना सहकार्य करतात. त्यांचे शेती गोंदिया शहरा नजीक असलेल्या टेमनी येथे आहे. दररोज हे दाम्पत्य सकाळी आणि जसा वेळ मिळेल तसा शेतात घालवतात. आज, शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता धनेंद्र भुरले शेतातून गोंदियाकडे परत येत होते. दरम्यान त्या मार्गावर असलेल्या होटल रजवाडा जवळ समोरून दुजाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. धनेद्र भुरले यांच्या गालाला छेदून गोळी गेली. सुदैवाने यातून बचावले. मात्र ते गंभीर जखमी झाले. अशाही स्थितीत ते स्वत:च्या मोटार सायकलने पोलिस ठाण्यात पोचले. पोलिसांनी त्यांना केटीएस रुग्णालयात नेले. मात्र वैद्यकीय अधिका-यांनी नागपुरला हलविण्याचा सल्ला दिला. परंतु परिस्थिती नाजूक असल्याने भूरले यांना गोंदियातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. धनेंद्र भुरले यांच्यावर झालेला हल्ला त्यांच्या पत्नी सविता बेदरकर यांच्या समाजकार्यामुळे झाला असल्याचा अंदाज प्रा. सविता बेदरकर यांनी व्यक्त केला.
Shooting at a social worker