कलर ‘फना- इश्क में मरजावां’चा पहिला भाग ३१ जानेवारी २०२२ रोजी प्रसारित होईल
~ प्रमुख भूमिकांत दिसतील अभिनेते झैन इमाम, रीम समीर शेख आणि अक्षित सुखिजा~
~ ‘फना- इश्क में मरजावां’चा पहिला भाग ३१ जानेवारी २०२२ रोजी प्रसारित होईल आणि नंतर दर सोमवार ते शुक्रवार रात्री १०:३० वाजता केवळ कलर्स वाहिनीवरून ही मालिका प्रसारित होईल ~
त्याला तिची काळजी होती, म्हणून त्याने तिच्याभोवती एक सुंदर काल्पनिक जग निर्माण केले. तिला त्याच्या संरक्षणाची गरज होती, म्हणून त्याने नेहमीच तिच्यावर बारीक लक्ष ठेवले. तो याला प्रेम म्हणतो, पण हे खरेच प्रेम आहे की केवळ त्याचे पछाडलेपण आहे? सर्वांना व्यापून उरणाऱ्या प्रेम नावाच्या भावनेवर प्रकाश टाकत, कलर्स आपले या वर्षातील पहिला फिक्शन शो ‘फना- इश्क में मरजावां’ प्रेक्षकांपुढे आणण्यास सज्ज आहे. नवीन खिळवून ठेवणाऱ्या कथेसह या शोमध्ये प्रेम आणि मैत्रीच्या धारणांना नवीन चेहरा दिला जात आहे. एका आकर्षक प्रेमकथेच्या माध्यमातून या भावनांना नवीन स्वरूप हा शो देत आहे. ही कथा पाखी (रीम समीर शेख), अगस्त्य (झैन इमान) आणि इशान (अक्षित सुखिजा) यांच्या आयुष्यांभोवती फिरते. हे सगळे एका वेगळ्याच घटनाचक्रात अडकतात आणि त्यामुळे त्यांचे आयुष्य उलटेपालटे होऊन जाते. दिप्ती कलवानी आणि करिष्मा जैन यांची निर्मिती असलेला हा शो ३१ जानेवारी २०२२ पासून सुरू होत आहे आणि रात्री १०:३० वाजता तो केवळ कलर्स वाहिनीवरून प्रसारित होईल.
व्हायकॉम18च्या हिंदी मास एंटरटेन्मेंट विभागाच्या चीफ कॉण्टेण्ट ऑफिसर मनीषा शर्मा या शोबद्दल म्हणाल्या, “प्रेमकथेला थराराची जोड हेच आमच्या शोचे परिपूर्ण सूत्र आहे. इश्क में मरजावा फ्रँचायझीच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांनी काही उत्कृष्ट कथा बघितल्या आहेत आणि ‘फना इश्क में मरजावा’ ही पूर्णपणे नवीन कथा प्रेक्षकांपुढे आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. प्रेमाच्या भावनेचे रूपांतर पछाडलेपणात झाल्यामुळे ते अगस्त्य व पाखीच्या आयुष्यासाठी कसे घातक ठरते ही बाजू, प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणाऱ्या या नाट्यामध्ये, रंगवण्यात आली आहे. सुंदर पण गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखा आणि खिळवून ठेवणारी कथा यांच्या माध्यमातून हा शो प्रेक्षकांना एका थरारक सफरीवर घेऊन जाण्यास सज्ज आहे.”
अगस्त्य हा एक सौम्य स्वभावाचा बिझनेसमन आहे आणि तंत्रज्ञानात कुशल आहे. त्याचे पाखीवर निखळ प्रेम आहे. त्याच्या आत्यंतिक प्रेमाचे रूपांतर हळूहळू पछाडलेपणात होऊ लागते. दुसऱ्या बाजूला पाखी नेहमीच आशावादी राहणारी आणि स्वच्छंद स्वभावाची मुलगी आहे. ती एक इव्हेण्ट मॅनेजमेंट कंपनी चालवते. अगस्त्य व पाखी एकमेकांचे बेस्ट फ्रेण्ड्स आहेत आणि आपल्या आयुष्यांतील प्रत्येक बारीकसारीक गोष्ट एकमेकांना सांगतात. पाखी तिच्या परिकथेसारख्या विश्वात राहते आणि ती या विश्वाची सर्वांत लाडकी मुलगी आहे असे तिला वाटते. मात्र, ती ज्याला खूप मानते, ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास टाकतो, तो अगस्त्यच तिच्या आयुष्याच्या सर्व नाड्या हातात ठेवून आहे आणि तिच्यासाठी परिपूर्ण आयुष्याचा भास निर्माण करत आहे, याची पाखीला कल्पनाच नाही. कथा उलगडत जाते आणि पाखी इशान नावाच्या एका तरुण, गुणी आँकोलॉजिस्टच्या प्रेमात पडते, तेव्हा तिचे आयुष्य एक रोचक वळण घेते. हे कळल्यानंतर अगस्त्य तिच्या अस्तित्त्वाच्या प्रत्येक स्तंभाला हलवून टाकण्याची योजना आखतो, कट रचतो. पाखीबद्दल अगस्त्यला वाटणारी आपलेपणाची भावना सर्व सीमा ओलांडते, तेव्हा परिस्थिती खूपच गुंतागुंतीची होत जाते आणि भावनांचे वादळ उठते. या वादळाचा तिघांच्या आयुष्यावर काय परिणाम होईल? प्रेमाच्या या लढाईत, कोण समर्पण करेल, फना होईल?
निर्मात्या दीप्ती कलवानी या शोबद्दल विचार व्यक्त करताना म्हणाल्या, “फना- इश्क में मरजावां हा कलर्सचा बऱ्याच काळापासून प्रतिक्षित प्रकल्प आहे. प्रेक्षकांना अवाक् करून सोडणारी प्रेमाची अनन्यसाधारण गोष्ट या शोच्या माध्यमातून कलर्स सांगणार आहे. अगस्त्यचा पछाडलेपणा असो, पाखीचा निरागसपणा असो किंवा इशानचा साधेपणा असो, अशा अनेकविध भावनांनी हा शो युक्त आहे. प्रेमाची, फारशी सर्वांपुढे न आलेली बाजू, हा शो प्रेक्षकांना दाखवणार नाही.” करिष्मा जैन याबाबत पुढे म्हणाल्या, “आमच्याकडे मध्यवर्ती भूमिकांमध्ये झैन, रीम व अक्षित या अफलातून कलावंतांची टीम आहे आणि या प्रतिभावान अभिनेत्यांसह काम करण्याचा अनुभव भन्नाट आहे. आमच्या या नवीन साहसात प्रेक्षकही सहभागी होतील आणि आमच्यावर प्रेम व पाठिंब्याचा वर्षाव करतील, अशी आशा आम्हाला वाटते.”
अगस्त्यची व्यक्तिरेखा साकारणारा झैन इमाम म्हणाला, “अगस्त्यसारख्या शक्तिशाली व्यक्तिरेखेच्या माध्यमातून टेलीव्हिजनवर पुनरागमन करणे माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आहे आणि मी खूप रोमांचित झालेलो आहे. माझे चाहते मला पूर्णपणे वेगळ्या रूपात बघणार आहेत, कारण अगस्त्यच्या व्यक्तिरेखेला बरेच पदर आहेत आणि हे पदर मी पडद्यावर जिवंत करणार आहे. त्याचे प्रेम, त्याचे झपाटलेपण, त्याला वाटणारी पाखीची काळजी हे सगळे काही प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणार आहे आणि त्यांना हे सगळे आवडेल, अशी आशा मला वाटते.”
पाखीची भूमिका करणारी रीम समीर शेख म्हणाली, “मी कलर्स वाहिनीवरूनच सुमारे दहा वर्षांपूर्वी माझा प्रवास सुरू केला होता आणि ‘फना इश्क में मरजावां’सोबत पुन्हा काम करताना मला खूप आनंद होत आहे. हा शो कोणत्याही रोमँटिक थ्रिलरपेक्षा वेगळा आहे आणि पाखीची व्यक्तिरेखा खूपच उदात्त आणि कणखरही आहे. तिचे मन अगदी निर्मळ आहे. प्रत्येक व्यक्ती चांगलीच आहे असे तिला वाटते आणि अगस्त्यवर तर ती स्वत:हून अधिक विश्वास टाकते. आपले प्रेक्षक तिच्या निष्पाप स्वभावाच्या प्रेमात पडतील आणि कथा पुढे जाते तेव्हा तिची व्यक्तिरेखा ज्या पद्धतीने आकार घेते, ते बघून थरारून जातील. मी खूपच उत्साहाने या थरारक प्रवासाची वाट बघत आहे.”
अक्षित सुखिजा इशानच्या व्यक्तिरेखेविषयी म्हणाला, “मला वाटते मी पडद्यावर निभावलेल्या व्यक्तिरेखांमध्ये इशानची व्यक्तिरेखा सर्वांत सदाचरणी असेल. तो खूपच निश्चयी आहे, त्याचे मन विशाल आहे आणि त्याला कायमच गरजूंना मदत करण्याची इच्छा असते. तो पाखीवर मनापासून प्रेम करतो, तिची काळजी घेतो, या प्रेमाची काय किंमत आपल्याला मोजावी लागेल याची कल्पना त्याला नाही. त्याच्या व्यक्तिरेखेतील सकारात्मकता प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करेल असे मला वाटते आणि या शोची अप्रतिम कथा त्यांना खिळवून ठेवेल.”
अगस्त्य आणि पाखीच्या दिवानगी की दास्तान दाखवणारा ‘फना- इश्क में मरजावां’ बघण्यासाठी सज्ज व्हा, ३१ जानेवारी २०२२ रोजी रात्री १०.३० वाजता पहिला भाग प्रसारित होणार, त्यानंतर सोमवार ते शुक्रवार रात्री १०:३० वाजता केवळ कलर्स वाहिनीवर!
Actors Zain Imam, Reem Sameer Shaikh and Akshit Sukhija will be seen in the lead roles~
~ ‘Fanaa - Ishq Mein Marjawaan’ will premiere on 31stJanuary2022 and air every Monday to Friday at 10:30 pm, only on COLORS’ ~
He cared for her, so he created a beautiful fictitious world around her. He needed to protect her, so he always kept a close watch on her. He labels it as love, but is it really love, or is it his mere obsession? Putting the spotlight on the emotion of all-consuming love, COLORS is all set to launch its first fiction offering of the year, ‘Fanaa- Ishq Mein Marjawaan’. With an intriguing new storyline, the show promises to redefine the perception of love and friendship through an enthralling love saga. It revolves around the lives of Paakhi (played by Reem Sameer Shaikh), Agastya (played by Zain Imam), and Ishaan (played by Akshit Sukhija), who find themselves in an unusual state of affairs that turns their lives upside down. Produced by Dipti Kalwani and Karishma Jain, the show will premiere on 31st January 2022 at 10:30 pm only on COLORS’.