Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी १५, २०२२

Search Embroidery | सर्च फाउंडेशन स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव कार्यक्रम

 


चंद्रपूर - केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकारच्या शिफारशीवरून, नोडल संस्था कोहँड्स (COHSNDS) व तांत्रिक संस्था (AIPSS) यांच्या मार्गदर्शनाखाली, तीन दिवसीय उमंग, उड्डाण, आणि उल्हास, एम्ब्रोईडरी आणि स्टिचिंग क्लस्टर, चंद्रपूर येथे स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव कार्यक्रम साजरा केला.

12 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय युवा दिन, राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे उद्घाटन, अध्यक्ष श्रीमती. नम्रता आचार्य ठेमस्कर – सचिव, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी व कार्यक्रमाचे उद्घाटक इंजि. दिलीप सं. झाडे – चेअरमन, सर्च एम्ब्रोईडरी अंड कांथा स्टिचिंग क्लस्टर फाउंडेशन, चंद्रपूर यांच्या हस्ते करून महिला व पुरुष कारागिरांसह (मॅरेथॉन) धावण्याची स्पर्धा उत्साहात साजरी करण्यात आली.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी  नृत्य आणि रांगोळी स्पर्धा असे सांस्कृतिक उपक्रम, या स्पर्धा एम्ब्रोईडरी आणि स्टिचिंग क्लस्टर, चंद्रपूरच्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये मुला-मुलींसह महिला व पुरुष कारागिरांनी आपले कौशल्य दाखवले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी उत्तरायण अर्थात मकर संक्रांतीच्या शुभ सणावर भारत सरकारच्या संस्कृत मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पतंग उडवण्याची स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा करणे होता आणि तो अतिशय उत्कृष्ट अशा रीतीने साजरा करण्यात आला व त्याचप्रमाणे कोविड नियमांचे सर्व पालन करून हा सोहळा महिला व पुरुष कारागिरांसह अतिशय जल्लोषाने साजरा करण्यात आला.

स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव व मकर संक्रांतीच्या या तीन दिवसीय उत्सवानिमित्त उडान आझादी या अमृत महोत्सवाचा समारोप एम्ब्रोईडरी आणि स्टिचिंग क्लस्टर, मौजा कोसारा, सर्व्हे नं. 104/4बी, चंद्रपूर म्हाडा एरिया, ता. व जि. चंद्रपूर येथे झाला, समारोपाच्या दिवशी श्रीमती. नम्रता आचार्य ठेमस्कर – सचिव, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी, इंजि. दिलीप सं. झाडे – चेअरमन, सर्च एम्ब्रोईडरी अंड कांथा स्टिचिंग क्लस्टर फाउंडेशन, चंद्रपूर यांच्या हस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. कविता हिंगणे - सहाय्यक प्राध्यापिका, एल. के. एम. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, चंद्रपूर, श्रीमती स्वाती घोटकर - अध्यक्ष, अजय बहुउद्देशीय संस्था भद्रावती, श्रीमती संगीता ठेंगणे – अध्यक्ष, ग्रामसंघ महिला बचत गट दाताळा, चंद्रपूर, श्रीमती. कुंदा दिलीप झाडे - विज्ञान शिक्षिका, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, बेलसनी व स्नेहल हाडके -  क्लस्टर डेव्हलपमेंट एक्झिक्युटीव्ह, सर्च एम्ब्रोईडरी अंड कांथा स्टिचिंग क्लस्टर फाउंडेशन, चंद्रपूर उपस्थित होते. विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या 42 स्पर्धकांना बक्षीसही देण्यात आली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.