कोल्हापूर / आनंद कांबळे : ज्येष्ठ विचारवंत आणि लढवय्ये नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन झाले आहे. ते ९३ वर्षाचे होते. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
प्रा. एन. डी. पाटील यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना लागोपाठ दोनवेळा ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांच बोलणे बंद झाले होते, ते उपचारासही ते फारसा प्रतिसाद देत नसल्याची माहिती देण्यात आली होती. तसेच मागच्या दोन दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नपाणी देखील गेलेले नव्हते. आज त्यांचे उपचारा दरम्यान निधन झाले.
एन. डी .पाटील यांनी सातत्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.