जिल्ह्यातील सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती आणि सिंदेवाही – लोनवाही नगर पंचायतीमध्ये मंगळवार दि. 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार आहे. 19 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केले त्यानंतर ओबीसी संवर्गातील सर्व रिक्त जागा खुल्या संवर्गातून घेण्याचा निर्णय झाला त्यानंतर जिल्ह्यातील नगरपंचायत येथील ओबीसी संवर्गातील पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला त्यानुसार मंगळवारी मतदान होणार आहे मतदान आणि मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने नगरपंचायत हद्दीतील चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.