Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जानेवारी ३०, २०२२

मनसे आयोजित नवनिर्माण क्रिकेट चषक विजेतेपदी छत्रपती इलेवन क्रिकेट संघ: उपविजेतेपदी उज्ज्वल नगर क्रिकेट क्लब






*नागपूर ३० जानेवारी २०२२*

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दक्षिण पश्चिम विभागाने उज्वल नगरच्या क्रीडांगणावर *नवनिर्माण चषक उज्वल नगर प्रीमियर टेनिस क्रिकेट स्पर्धा* आयोजित केली होती.
एक सप्ताह पूर्वी सुरू झालेल्या या स्पर्धेत नागपुरातील विविध परिसरातून एकूण 25 क्रिकेट संघाने यात सहभाग नोंदवला होता.अतिशय नियोजनबद्ध वातावरणात स्पर्धेच्या सर्व फेरी पार पडल्या व आज सकाळी झालेला अंतिम सामना छत्रपती एलेवेन व उज्वल नगर संघात झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात छत्रपती एलेवन चमू विजयी झाली. *विजयी व उपविजयी संघाला नवनिर्माण चषक व रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली*.
*उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज यांनाही पारितोषिक प्रमुख पाहुणे मनसेचे राज्य सरचिटणीस व माजी क्रिकेटपटू हेमंत गडकरी यांच्या हस्ते देण्यात आले*
मनसे शहर अध्यक्ष अजय ढोके, विभाग अध्यक्ष तुषार गिर्हे, विभाग उपाध्यक्ष चेतन बोरकुटे , शाखा अध्यक्ष देवेंद्र ठाकरे व इतर पदाधिकारी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
क्रिकेट स्पर्धेतील रोख बक्षिसे दक्षिण पश्चिम मनसे विभाग अध्यक्ष तुषार गिर्हे यांच्या तर्फे देण्यात आले होते.
या अंतिम सामन्यादरम्यान सहभागी खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी श्री.हेमंत गडकरी यांनी मैदानावर उतरून अतिशय चांगल्या फलंदाजीचे प्रदर्शन केले व उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
स्पर्धेच्या आयोजनासाठी मनसे विभाग अध्यक्ष तुषार गिऱ्हे यांचेसह उज्ज्वल नगर आयोजन समितीचे रोहित मौर्य, अथर्व हाडगे, जतिन सलामे, प्रतीक साखरकर, राजेश नागपुरे, आदित्य लढी इत्यादी सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
आपला नम्र🙏
अजय ढोके शहर अध्यक्ष मनसे नागपूर.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.