Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी १४, २०२२

आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिका-यांची बैठक बोलावली @jorgewar_speaks

 दिव्यांगाना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करुन दया - आ. किशोर जोरगेवार

मनपा अधिका-याची बैठक घेत सुचना



  दिव्यांग बांधवांना स्वंयरोजगारातून आर्थिक सक्षम करण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरु आहे. यासाठी मनपानेही पूढाकार घ्यावादिव्यांग बांधवांच्या स्वयंरोजगारासाठी लागणारा स्टहातठेला आम्ही उपलब्ध करुन देणार आहोत. मनपाने यासाठी जागा उपलब्ध करुन दयावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांना केल्या आहे.
  मनपातील कामाचा आढावा व कोरोना बाबत उपयोजनाचा आढावा घेण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिका-यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर सुचना केली आहे. शासकीय विश्राम गृहात आयोजीत या बैठकीला मनपा आयुक्त विपीन पालीवालमनपा आरोग्य अधिकारी वनीता गर्गेलवार,  शहर अभियंता महेश बारईनगर रचनाकार दहिकरउप नगर रचनाकार दयादीप मांडवगडेअभियंता रविंद्र हजारेअभियंता सौरभ गौतम आदि अधिका-र्यांची उपस्थिती होती.
     दिव्यांग बांधव हा देखील समाजाचा घटक आहे. त्यामूळे त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. गरजू दिव्यांग बांधवांना आर्थिक सक्षम करण्याच्या दिशेने माझे प्रयत्न सुरु आहे. अशा दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी आपण प्रेरित करत आहोत. यासाठी लागणारा स्टल अथवा हातठेला आपण स्वखर्चातून त्यांना उपलब्ध करुन देणाचे नियोजन केले आहे. मात्र सदर ठेवा लावण्यासाठी महानगरपालिकेने त्यांना जागा उपलब्ध करुन द्यावी अशी सुचना या बैठकीत आ. जोरगेवार यांनी केली आहे. सोबतच कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता उपायोजना करा, आरोग्य सुविधा सुधारण्याकरिता मनपाचे प्राथमिक आरोग्य केंद्र अद्यावत करा अशा सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिका-र्यांना केल्यात. सर्व सोयी सुविधायुक्त अग्नीशमनचे दोन वाहने उपलब्घ करण्यात यावीतजटपूरा गेटची वाहतुक कोंडी दुर करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर पर्यायी मार्ग सुरु करण्यात यावाबाबूपेठ येथील स्मशान भुमी विकसीत करण्यात यावीकोहिणूर तलावाचे सौदर्यीकरण करण्यात यावेयासह अनेक सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला केल्या आहे. 







SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.