Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जानेवारी २७, २०२२

लोह खाणीतील 'मलाई'साठी लाॅयड्सच्या उपाध्यक्षावर जिवघेणा हल्ला; आमदाराच्या जावयाविरोधात गुन्हा दाखल


अहेरी विधानसभेचे आमदार धर्मराव आत्राम यांच्या जावयाविरोधात गुन्हा दाखल




गडचिरोली : जिल्ह्यातील सुरजागड लोह खाण कंपनी लाॅयडस् मेटल्स एन्ड एनर्जी लिमीटेडचे उपाध्यक्ष अतूल खाडीलकर यांना २४ जानेवारीच्या रात्री अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे जावई ऋतुराज हलगेकर, त्यांचे बंधू जयराज हलगेकर यांचेसह इतर लोकांनी खाडीलकर यांना आलापल्ली येथील किरायाच्या राहते घरी जाऊन बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सुरजागड लोह खाण पुन्हा चर्चेत आली असून मोठी खळबळ उडाली आहे.

अतूल खाडीलकर यांनी याबाबतची तक्रार मंगळवारी अहेरी पोलीस स्टेशन येथे नोंदवली आहे. पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार अतूल खाडीलकर हे हलगेकर आणि त्यांच्या नातेवाईकासंदर्भात सहन न होण्यासारखे बोलले त्यामुळे संतप्त झालेल्या हलगेकरांनी आपल्या साथीदारांसमवेत खाडीलकरांच्या आलापल्ली येथील किरायाच्या घरी जाऊन त्यांना मारहाण केली. घरातील सामानाची तोडफोड केली खाडीलकरांच्या तक्रारीनंतर अहेरी पोलीसांनी ऋतुराज हलगेकर, जयराज हलगेकर, जे.डी., भोजराज व इतर जणांवर भादंवि चे कलम ४५२, ३२३, ४२७, १४३, १४७, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा नोंदवला असून पूढील तपास अहेरीचे ठाणेदार शाम गव्हाणे हे करीत आहेत.

जिल्हाभरात सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेनुसारच सुरजागड येथील लोहदगडाच्या वाहतुक आणि कामावर आपले कार्यकर्ते ठेवण्यावरून खाडीलकर आणि हलगेकर यांच्यात बाचाबाची झाली होती. याचा वचपा काढण्यासाठीच बेदम मारहाण आणि चाकूचा वार केल्याचे बोलले जात आहे.

स्थानिक ग्रामसभा आणि नागरिकांच्या विरोधानंतरही अनेक कायदे धाब्यावर बसवून बेकायदेशीरपणे खोदल्या जाणाऱ्या या लोह खाणीतील आर्थिक हिस्सेवाटणी आणि वर्चस्व प्रस्थापित करण्यावरून मागिल काही दिवसांपासून वादविवाद व दबाव टाकून काम काढून घेण्याचा प्रयत्न सुरू होता, त्यातूनच सदरचा प्रकार घडल्याचेही बोलल्या जात आहे.

जावयाने केलेल्या मारहाण प्रकरणाला निस्तरण्याचा प्रयत्न आमदार धर्मराव आत्राम यांनी काल जोरदार प्रयत्न केला होता, मात्र आज याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरजागड खाणीचे गौडबंगाल बाहेर आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.