रामाळा तलाव येथे इको प्रोतर्फे नव्या वर्षीच्या पहिल्या दिवशी संकल्प अभियान
चंद्रपूर | शहरातील पर्यावरणप्रेमी इको-प्रो पर्यावरण विभागाच्या वतीने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारी रोजी रामाळा तलाव येथे संकल्प अभियान कार्यक्रम घेण्यात आला. शहराला प्रदुषणमुक्त करण्यासाठी प्रसंगी दवाबगट निर्माण करून, चंद्रपूर शुध्द हवा कार्यक्रम’ या अभियान राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
यावेळी इकोप्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी सांगितले कि, या वर्षात राज्यव्यापी शहरी तलाव संवर्धन व प्रदुषषमुक्ती अभियान राबवून इको-प्रो वन्यजीव विभागकडुन चंद्रपूर शहरालगतच्या सिटीपीएस-वेकोली परिसरातील मानव-वन्यप्राणी संघर्ष व जिह्यातील बिबट समस्यामुक्त ग्रामसाठी कार्य करणे,
रामाळा तलाव प्रदुषणमुक्तीसोबत त्याचे सौदर्यीकरण व पर्यटन विकासाकरिता प्रयत्न करणे, चंद्रपूर किल्ला व वास्तु संवर्धनासोबतच ऐतिहासिक पर्यटन विकासाच्या दृष्टीने व्यापक कार्य करण्यात येईल.
इको-प्रो महिला मंचच्या माध्यमाने महिला विषयक समस्यावर व्यापक जनजागृती कार्यक्रम राबविण्याचा संकल्प असून, यात सैनेटरी नैपकिन, पाळी विषयक समस्याबाबत कार्य करण्याचा संकल्प, शिक्षण विभागाकडुन अभ्यासिका सुरू करण्याचा संकल्प, इको-प्रो आरोग्य विभाग कडून आरोग्य व्यवस्था विषयक कार्य करण्याचा संकल्प या नवीन वर्षात करण्यात आलेला आहे.