गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा केला गौरव.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२० जानेवारी:-
शहीद पोलिस उपनिरीक्षक दिपक रहिले यांना दिनांक 20 जानेवारी रोज गुरुवारला मौजा कान्होली या त्यांच्या जन्मगावी शहीद दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
20 जानेवारी 2003 रोजी चिचगड पोलिस स्टेशन हद्दीत सिंगणनडोह गावाजवळील पुलावर नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात कान्होली येथील पोलीस उपनिरीक्षक दीपक सखाराम रहिले हे शहीद झाले होते.
मौजा कान्होली येथील दीपक रहिले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, शहीद दिनानिमित्त श्रद्धांजली वाहून, त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहीद दीपक राहिले यांचे पुत्र सागर रहिले, भाऊ महेंद्र रहिले, नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर, सशस्त्र दूरक्षेत्र पवनीधाबेचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक शेख, पोलीस पाटील युवराज कापगते, ग्रामपंचायत सरपंच संजय खरवडे, माजी पोलीस पाटील कोदुजी रहिले,लताबाई थेर, सुनीता रहिले,शिक्षक राऊत, बघेल,,दुधराम खरवडे उपस्थित होते.
उपस्थित पाहुण्यांनी शहीद दीपक रहीले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली. शहिद दीपक राहिले यांच्या स्मृतींना उजाळा देऊन, शहिद दिनाचे महत्त्व ठाणेदार
हेगडकर यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना पटवून दिले. उपस्थित मान्यवरांचे देखील यावेळी गौरवपर भाषणे झाली. तसेच इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कोविड 19 कोरोनाव्हायरस चे प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात आले. गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया पोलीस दलाने नवेगावबांध पोलीस ठाणे अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक महेंद्र रहिले यांनी मांडले, संचालन प्रा. जितेंद्र रहिले यांनी केले,तर उपस्थितांचे आभार सागर रहिले यांनी मानले.
कार्यक्रमाला गावकरी आबालवृद्ध महिला पुरुष ,तसेच विद्यार्थी,नवेगावबांध पोलिस स्टेशन व धाबेपवनी सशस्त्र दूर क्षेत्राचे अधिकारी-कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.