पहिल्या दिवशी चंद्रपूर शहरातील 19 केंद्रांवर पाच हजार 661 मुलांना दिली जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लस
चंद्रपूर | शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहरातील शाळा आणि अंगणवाडीतील १ ते १५ वर्षांपर्यंतच्या ३ जानेवारीपासून जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरवात झाली. सोमवारी ३ जानेवारी रोजी पहिल्या दिवशी शहरातील 19 केंद्रांवर पाच हजार 661 मुलांना लस देण्यात आली.
चंद्रपूर शहरात एकूण ३ लाख ५६ हजार ७५ लोकसंख्येपैकी १ ते १५ वयोगटातील मुलांची संख्या ७६ हजार २५ इतकी आहे. यासाठी १६८ शासकीय आणि खासगी शाळा आणि १८५ अंगणवाडीमध्ये केंद्र नियोजित करण्यात आले असून, १२ सुपरवायझरच्या नेतृत्वात ४६० चमू कार्यरत राहणार आहेत. एकूण ७६ हजार २५ मुलांपैकी पाच हजार 661 मुलांना पहिल्या दिवशी लस देण्यात आली.