चंद्रपूर जिल्हा कोचिंग क्लासेस असोसिएशन
चंद्रपूर: आज दिनांक 15 जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्हा कोचिंग क्लासेस असोसिएशन मीटिंग( कोरोना नियम पाळून) दुपारी 4 वाजता इर्शाद शेख सर यांच्या राणाज स्पर्धात्मक क्लासेस मध्ये पार पडली
.सदर बैठक सीसीएचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री वाघ सर यांच्या मार्गदर्शनात तसेच चंद्रपूर जिल्हा कोचिंग क्लासेस असोसिएशनचे अध्यक्ष निमेश मानकर यांच्या नेतृत्वात पार पडली. बैठकीत कोरोनामुळे उद्भवलेल्या समस्या बाबत चर्चा करण्यात आली.
शासनाने व जिल्हा प्रशासनाने कोचींग क्लासेस, स्पर्धात्मक क्लासेस, कम्प्युटर क्लासेस वर लावलेल्या निर्बंध बाबत चर्चा करण्यात आली .तसेच CCA ने राज्यपातळीवर पारित केलेल्या 50% क्षमतेने कोचिंग क्लासेस सुरू करण्याबाबतचा ठराव एकमुखाने बैठकीत पार पडला. दिनांक 17 जानेवारी रोजी मा. जिल्हाधिकारी साहेब भेटून 50 टक्के क्षमतेने कोचिंग क्लासेस, कम्प्युटर क्लासेस, स्पर्धात्मक क्लासेसला सुरू करण्याबाबतचे निवेदन देण्याबाबत नियोजन करण्यात आले. CCA ला महाराष्ट्र पातळीवर बळकट करण्याकरिता रजिस्ट्रेशन करण्यासंदर्भात सुद्धा मिटिंग मध्ये चर्चा करण्यात आली.
यावर चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सन्माननीय संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबत मोलाचे मार्गदर्शन सीसीए राज्यध्यक्ष श्री वाघ सर यांनी भ्रमणध्वनी द्वारे संचालकांना केले आणि त्यांच्या शंकेचे निरासरण केले. मीटिंग मध्ये CCA च्या भविष्यातील वाटचालीबद्दल सुद्धा चर्चा करण्यात आली. आजच्या बैठकीत CCA जिल्हाध्यक्ष निमेश मानकर सर, सचिव श्री इर्शाद शेख सर, सहसचिव श्री नवल काकडा सर, कोषाध्यक्ष सौ.सोनाली कथडे मॅडम, श्री शेखर सर श्री त्रिलोक गांधी सर, श्री गजानन इरबतूनवार सर ,श्री संजय तूरीले सर, श्री रमजान शेख सर, श्री राकेश श्रिकोंडावार सर, श्री अतुल ठाकरे सर श्री श्रीकांत मददावार सर,श्री अशोक ढोक सर यांची उपस्थिती प्रमुख्याने होती. सदर मिटिंग चे प्रस्ताविक सचिव श्री इर्शाद शेख सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री संजय तूरीले सर यांनी मानले.